हा शोध अंतरीचा…
हा रजनीचा शांत गार वारा आणि मी नेहमी करते हितगुज
सोबतीला गाणी
आणि
आठवणी !
या आठवणी बहरताना
फुलतात भावना
विसरूनी हे जग सारे
चमचमतात क्षणांचे लख्ख काजवे
चढते नव स्फुरण
जाते हरपून भान
वाटते जपावे हे हितगुज
पण
ही जाणीव वास्तवतेची
झुळूक हळुवार करून देते.
सोबतीचा चंद्र देतो एक वेगळीच प्रेरणा
भावना आणि वास्तवतेची जाणीव गुंफुनी
मिळतात सारी उत्तरे!
सावरते मग मी सारे अंतरीचे तुफान
अन् पुन्हा नव्याने सापडते मी मज
अन् पुन्हा नव्याने सापडते मी मज
बसं आणि काय हवं ?
– अपेक्षा बेलवलकर
– सांगली