Friday, May 3, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य : खरा न्याय मिळेल काय? - गुलचंद

जनभूमी साहित्य : खरा न्याय मिळेल काय? – गुलचंद

निर्भयाचं तर ऐकलं होतं

माझ्यासोबत पण तेच घडलं

वासनेपायी नराधमांनी

माझंही आयुष्य उध्वस्त केलं.

कितीतरी विनवण्या केल्या

नराधमांनी नाही ऐकलं

आरं जगात फेमस माझ्या देशात

एवढं पशुत्व कुठून आलं?

बाबा माझे म्हणायचे

मुलगी डाक्टर व्हणार हाय

माफ करा बाबा मला

तुमचं स्वप्न अधुरंच राहणार हाय.

अहो माझ्या देशात एवढं तरी घडंल काय?

निदान देवळात तरी आमच्याकडे

कुणी पवित्र नजरेनं बघेल काय?

त्या नराधमांना फाशी देऊन मला न्याय मिळेल काय?

अत्याचाऱ्याला शिक्षा करणं हा आपला कायदाच हाय

पण अत्याचारंच होणार नाहीत

अशी मानसिकता होईल काय?

अन् तुम्हीच सांगा बाबा मला खरा न्याय मिळेल काय?

गुलचंद

(मोहिद्दीनअली चंदुलाल मुलाणी)


कडलास ता. सांगोला जि. सोलापूर

७३८७८६५१४६

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय