Saturday, April 20, 2024
Homeग्रामीणहाथरस येथील अमानवीय अत्याचाराच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निषेध आंदोलन

हाथरस येथील अमानवीय अत्याचाराच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निषेध आंदोलन

परळी : हाथरस उत्तर प्रदेश येथील मुलीवर झालेल्या बलात्कार व अत्याचाराविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज सिरसाळा येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

महिलांवरती अत्याचार मा.क.पा.सहन करणार नाही व या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडितेस न्याय द्यावा, अशी मागणी माकपचे यावेळी माकपाचे सुदाम शिंदे यांनी केली .

तसेच माकप चे तालुका सचिव काॅ. गंगाधर पोटभरे यांनी जातीवाद व सांप्रदायिकता वाढत आहे आणि अशा प्रवत्ती विरोधात आपण एकजुट होऊन लढा देणं गरजेचं आहे, असल्याचे मत व्यक्त केले. तसेच बालाजी कडभाणे यांनी महिलांवर होणारे अत्याचार माकप सहन करणार नाही व आरोपींना तात्काळ शिक्षा करा, अशी मागणी केली.

यावेळी मुरलीधर नागरगोजे, गंगाधर पोटभरे, बडे भगवान, मदन वाघमारे, महादेव शेरकर, विशाल देशमुख, मनोज देशमुख, प्रवीण देशमुख, प्रकाश उजगरे, अशोक जाधव, अशोक शेरकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय