कविता
“सत्य मेव जयते”
(भाग पहिला)
छळले आम्हा ज्यांनी
ते परके कुणीच नव्हते
होते कुणी शेजारी
अन्य सोयरे धायरे होते ….
जातीचा डंका नव्हता
म्हणून साथ नव्हती त्यांची
धम्मात मिसळू पाहतो
पण धर्म केला त्याचा ….
खंडी च्या झुंडीतूनी
मार्ग कसा काढावा
जसा तपत्या दूधात
मीठाचा खडा पडावा ….
मी पाहिले अनंत
साधू संत आणि महंत
संपत्ती पाहता त्यांची
डाकूला ही वाटे खंत ….
चित्र आणि पत्रकार
विश्वासाचे शिलेदार
त्यांची ही संपती आज
वाटते शंकाखोर….
पर्वा ची पर्वा न करता
त्यास आणले अडचणीत
कायद्याच्या कचाट्यातूनी
अन् काढली त्याने वाट….
शोषित नसतो इथे
हर दीन कमजोर
त्यांची ही संपत्ती आज
आहे करोडोच्या घरात….
नाही समाजाच रुण
नाही भावकीच देण- घेण
तरी मिळतो त्यास मान
अधुनिक बाजारात ….
उच्च शिक्षित गुलाम
आज जास्त दावणीला
त्यांचा म्हणे तो गुरू
जो आहे आज सत्तेत….
शिक्षणाचा अर्थ आज
वाटतोय शून्य व्यर्थ
आज तेही बसलेत
त्यांच्याच पंगतीला….
शेतकऱ्यांचे मरण
ती आत्महत्या नसते
असावे लागते नट
आज च्या संगतीला….
गुटख्याचे भाव वाढले
मटका ही वधारलेला
तरीही तो उभा होता
रेशन च्या लाईनीला….
इथं पुरोगामी परवा
वाजवीत होत्या टाळ्या
विरोध कसा करावा
मी त्यांच्या दावणीला….
तेव्हाच कळले सर्वा
त्यांच्या शिक्षणाचा अर्थ
पण झाला नाही विरोध
कारण सत्तेचे ते पार्थ….
स्वातंत्र्य ज्यांचे त्यांचे
कशाला उठाठेव
पण आणू नये त्यांनी
खोट्या समाजवादाचा आव
खोट्या पुरोगामीत्वाचा आव…
– गंगाधर गायकवाड
– नांदेड.