Tuesday, December 3, 2024
Homeराष्ट्रीयIndian air force : चेन्नईत भारतीय हवाई दलाचा नेत्रदीपक हवाई शो...

Indian air force : चेन्नईत भारतीय हवाई दलाचा नेत्रदीपक हवाई शो (video)

चेन्नई : भारतीय हवाई दलाचा 92 वा वर्धापन दिनानिमित भारतीय वायुसेनेने तामिळनाडूमधील चेन्नई मरीना एअरफील्डवर एअर ॲडव्हेंचर शो आयोजित केला होता. 21 वर्षांत प्रथमच, चेन्नईने हवाई दल दिन सोहळ्याचे आयोजन केले होते. हवाई दलाच्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेच्या 72 विमानांनी सुलूर, तंजावर, तांबरम, अरक्कोनम आणि बेंगळुरू येथून मरीना बीचवर होणाऱ्या भव्य एअर शोमध्ये भाग घेण्यासाठी उड्डाण केले. (Indian air force)


सुपरसोनिक लढाऊ विमान राफेलसह जवळपास 50 लढाऊ विमानांनी एकाचवेळी आकाशात वेगवेगळ्या रंगांची उधळण केली. डकोटा आणि हार्वर्ड, तेजस, एसयू-30 आणि सारंग यांनीही हवाई सलामीमध्ये सहभाग घेतला.

सुखोई एसयू-30 नेही प्रात्यक्षिकं दाखवली. देशाचा गौरव आणि स्वदेशी असलेल्या अत्याधुनिक तेजस आणि हेलिकॉप्टर प्रचंडनेही 21 वर्षांच्या अंतराने चेन्नईमध्ये आयोजित प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला. या एअर शोमध्ये, स्वदेशी बनावटीच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस, ज्याला भारताची शान म्हटले जाते, राफेल, मिग-29 आणि सुखोई-30 MKI सारख्या आधुनिक लढाऊ विमानांनीही फ्लायपास्टमध्ये भाग घेतला.

याशिवाय सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीम आणि सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमनेही आपले हवाई स्टंट दाखवले. याव्यतिरिक्त, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रचंड आणि प्रगत हलके हेलिकॉप्टर ध्रुव एमके 4 देखील सहभागी झाले. याशिवाय नौदलाच्या P8I आणि विंटेज डकोटा यांनीही फ्लायपास्टमध्ये भाग घेतला. (Indian air force)

या कार्यक्रमात हवाई कसरती व्यतिरिक्त सागर, आकाश, बाण, त्रिशूल, रुद्र आणि ध्वज ही रचनाही दाखवण्यात आली. सुखोई एसयू-30 लढाऊ विमानाने युद्धाभ्यास केले आणि ज्वाला सोडल्या.सुमारे दीड लाख लोक मरिना बीचवर उपस्थित होते.

अतिशय नेत्रदीपक आणि धाडसी हवाई प्रात्यक्षिके भारतीय हवाई दलाच्या विमाने आणि हेलिकॉप्टर सादर केली.



संबंधित लेख

लोकप्रिय