Tuesday, January 21, 2025

ब्रेकिंग : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई, ता.२४ : आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेतला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

कोरोना महामारी सुरु असेपर्यंत आशा स्वयंसेविका व आशा गटप्रर्वतक यांना दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यास मान्यता देण्यात आली. प्रस्तावित वाढ जुलै 2021 या महिन्यापासून देण्यात येईल. यासाठी होणाऱ्या अंदाजे 135 कोटी 60 लाख रुपयांच्या वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles