Pune : पुणे शहरातील खराडी भागात मुळा-मूठा नदी पात्रात एका तरुणीचा मृतदेह अत्यंत अमानुष अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. (Girl’s body in the river) या तरुणीची हत्या करून तिचे डोकं, हात-पाय धडापासून वेगळे करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अंदाजे 18 ते 30 वयोगटातील तरुणीशी संबंधित आहे.
चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जेनी लाईट कन्स्ट्रक्शन जवळच्या नदीपात्रात पोलिसांना या तरुणीचा धड सापडला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तरुणीचा मृतदेह अत्यंत क्रूर पद्धतीने तुकडे करून टाकण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांनी तिच्या हत्येचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे तुकडे केले असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर पुण्यात (Pune) घडलेल्या या हत्येने शहरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणी अधिक तपास करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. पुणे पोलीस या घटनेचा तपास करून आरोपीला लवकरच अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा :
कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान, भाजपने झटकले हात
गटप्रवर्तकांना चार हजारांची वाढ असमाधानी ; पुन्हा आंदोलनाची घोषणा
बार्टीच्या ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती
ब्रेकिंग : गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ
Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत भरती; पात्रता 10वी
मोठी बातमी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना