Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : १४ वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींची जिल्हा बॉल बॅडमिंटन स्पर्धेचा...

PCMC : १४ वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींची जिल्हा बॉल बॅडमिंटन स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : १४ वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींची जिल्हा बॉल बॅडमिंटन स्पर्धा २०२४ ची अंतिम स्पर्धा संपन्न झाली असून अनेक विद्यालयांनी या स्पर्धेत बाजी मारली आहे. (PCMC)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यमुनानगर येथील अमृता विद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेवेळी क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील आणि क्रीडाधिकारी अनिता केदारी यांनी खेळाडूंची ओळख करून घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्पर्धा प्रमुख तसेच पर्यवेक्षक रंगराव कारंडे उपस्थित होते. तर शेखर कुलकर्णी, लक्ष्मण माने, हनुमंत सुतार, मुंडे यांच्यासह प्रसाद हरपळे, विशाखा पालांडवे, मृणाल दाबोले यांनी स्पर्धेचे कामकाज पाहिले. (PCMC)


जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात मातृ विद्यालयाने सेंट उर्सुला हायस्कूल विरुध्द विजय मिळवला. तर अमृता विद्यालयाने विद्यानिकेतन विद्यालयाविरुध्द विजय मिळवला.

१४ वर्षे मुलींच्या गटात अमृता विद्यालयाने न्यू पुणे पब्लिक स्कूल विरुद्ध विजय प्राप्त केला. तर रॉयल वर्ल्ड स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूल ने विजय प्राप्त केला.

१७ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटाने अमृता विद्यालयाने सेंट उर्सुला हायस्कूल विरुध्द खेळत विजयी झाला. तर सिटी इंटरनॅशनल स्कूलने मातृ विद्यालयावर मात केली. तसेच १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने अमृता विद्यालयाने सिटी इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध विजय मिळवला. तर सेंट उर्सुला हायस्कूलने आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध खेळत विजय मिळवला. (PCMC)

१९ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटाने सी. एम. एस. हायस्कूलने सिटी इंटरनॅशनल स्कूल विरुध्द लढत विजय मिळवला. तर अमृता विद्यालय हे तृतीय ठरले. तसेच १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या गटाने सी.एम.एस. हायस्कूलने अमृता विद्यालयावर विजय मिळवला. तर सेंट उर्सुला हायस्कूल हे तृतीय क्रमांकावर राहिले.

संबंधित लेख

लोकप्रिय