Thursday, May 2, 2024
Homeराष्ट्रीयशेजाऱ्यांच्या भांडणात दोन्ही पक्षांना ४५ दिवस यमुना नदी स्वच्छ करण्याचे आदेश, न्यायालयाचा...

शेजाऱ्यांच्या भांडणात दोन्ही पक्षांना ४५ दिवस यमुना नदी स्वच्छ करण्याचे आदेश, न्यायालयाचा अनोखा निर्णय

नवी दिल्ली : दिल्लीतील दोन शेजाऱ्यांच्या भांडणातील वादावर दिल्ली उच्च न्यायालयाने अनोखा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांनी ४५ दिवस यमुना नदी स्वच्छ करावी, असे आदेश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील दोन शेजाऱ्यांमधील भांडणातून दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केला होता. यात काही जण जखमी झाले. यानंतर दोन्ही गटांनी शांततेनं तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापूर्वीच जैतपूर पोलिसांनी ममता देवी आणि इतरांवर गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर पक्षकारांनी सांगितले की, त्यांच्यातील वाद मिटला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध नोंदवलेली एफआयआर रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली. या वादावर दिल्ली उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना ४५ दिवस यमुना नदी स्वच्छ करण्याचा अनोखा निर्णय दिला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जसमीत सिंह यांनी दोन्ही पक्षांना दिल्ली जल बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ४५ दिवस यमुना नदी स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने आरोपी आणि तक्रारदार यांना १० दिवसांच्या आत दिल्ली जल बोर्ड टीम सदस्य अजय गुप्ता यांना भेटण्यास सांगितलं आहे. तसेच यमुना नदीची स्वच्छता केल्यास दोन्ही पक्षांना जल बोर्डाकडून एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय