Saturday, May 18, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे महत्वाचे आवाहन 

महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे महत्वाचे आवाहन 

मुंबई : महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्र संपकरी आशा व गटप्रवर्तकांना संपाबाबत महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. आशा व गटप्रवर्तकांनी संप यशस्वी करण्याचा आहे. तसेच ऑनलाइन ऑफलाइन न करता आपला संप चालूच ठेवायचा आहे. नोटीस आल्यास तर कोणीही घाबरू नये असे आवाहन महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ.आनंदी अवघडे, महासचिव कॉ.पुष्पा पाटील, खजिनदार कॉ. अर्चना घुगरे यांनी केले आहे.

फेडरेशन ने म्हटले आहे की, आशा व गटप्रवर्तक 12 जानेवारीपासून आशा व गटप्रवर्तक यांचा जीआर निघण्यासाठी संप सुरू आहे. आपण सध्या कोणतेही ऑनलाइन ऑफलाइन न करता संप चालू ठेवलेला आहे. काही काम हे आशांच्या योजनेच्या बाहेरची आपल्याला नेहमी सांगितले जातात. त्याप्रमाणे मराठा आरक्षण सर्वे सुद्धा आपल्या कामाच्या हेड च्या बाहेरचे काम आपल्याला सांगितले जात आहे. त्यासाठी काही पत्र व नोटीसा किंवा ट्रेनिंग साठीच नियुक्तीपत्र असा आपल्याला आलेला आहे. परंतु आपण संपाच्या काळात कोणतेही काम करणार नाही हा संघटनेचा निर्णय आहे. त्यामुळे आपण या संघटनेच्या निर्णयाबरोबर ठाम राहून या सर्व कामाला नकार द्यावे, असे फेडरेशन ने म्हटले आहे. 

पुढे म्हटले की की, काही जिल्ह्यांमध्ये हे मराठा आरक्षण सर्वेचे ट्रेनिंग झाले तिथे आशांनी नकार दिलेला आहे. त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून ते काम सुरू झालेले आहे. त्यामुळे न घाबरता या कामाला नकार द्या व आपला संप यशस्वी करावा. तहसीलदार किंवा बीडीओ किंवा अजून कोणाच्या नोटीस आल्यास त्याला न घाबरता आम्हाला पाठवा आम्ही त्याला उत्तर लिहून देऊ परंतु संप फोडुन द्यायचा नाही, या निर्णयावर ठाम राहा. आपण मोबदल्या वरचे कर्मचारी असल्यामुळे कोणीही आपल्याला कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा कारवाई किंवा काढून टाकण्याची प्रोसेस यापैकी काहीही करू शकत नाहीत याची नोंद महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांनी घ्यावीी. काढलेली पत्र फक्त आपल्याला धमकावण्यासाठी आहे त्यांच्या धमकवण्याला आपण बळी पडायचे नाही, असे आवाहन देखील फेडरेशन ने केले आहे. 

LIC life insurance corporation

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय