Sunday, February 16, 2025

जुन्नर : खोडद चौक, पाटेखैरेमळा येथील अंडरपासच्या कामांना तातडीने मंजुरी द्या; डॉ. अमोल कोल्हे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

जुन्नर :  खोडद चौक, पाटेखैरेमळा येथील अंडरपासच्या कामांना तातडीने मंजुरी द्या, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली आहे.

खोडद, हिवरे आणि परिसरातील ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांची खा. कोल्हे यांनी भेट घेतली.

नारायणगाव बायपास रस्त्यावरील तिसऱ्या फेजमधील खोडद चौक व पाटेखैरेमळा येथील अंडरपासच्या कामांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद केंद्रीयमंत्री गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या, असल्याचे खा. कोल्हे यांंनी म्हटले आहे. 

Related Articles

- Advertisement -

Latest Articles