Sunday, May 5, 2024
Homeनोकरीपती-पत्नीचे कांदे काढता-काढता नशीब उजळलं; दोघेही झाले पोलीस

पती-पत्नीचे कांदे काढता-काढता नशीब उजळलं; दोघेही झाले पोलीस

पुणे : शिरूर तालुक्यातील नवरा बायकोच्या जोडप्याने पोलीस भरतीची परीक्षा पास केली आहे. शेतात कांदा काढणी करत असताना शेवटची मेरिट लिस्ट लागली आणि नवरा बायको दोघांचीही पोलीस भरतीत निवड झाली.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चार वर्षापासून तुषार शेलार हे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होते. पुरेसे प्रयत्न करूनही नशीब साथ देत नव्हते. अखेर प्रयत्न चालू ठेवत शेतीतील कामात मन रमविले. दोन-अडीच वर्षांपासून पत्नीची साथ आणि सक्रिय सहभाग मिळत गेला. पत्नीनेही त्याच्याबरोबर पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर आता अर्धांगिनी असलेल्या भाग्यश्री शेलार हिच्या सर्वतोपरी सहकार्याने तुषार शेलार याचेही भाग्य उजाळले. अन् पती-पत्नी दोघेही एकाचवेळी पोलीस झाले.

पोलीस भरतीची चौथी व अंतिम मेरिट लिस्ट आज जाहीर झाली. तिकडे डोळे लावून बसलेल्या चांडोह (ता.शिरूर) येथील तुषार शेलार आणि भाग्यश्री शेलार या दांपत्याची नावे त्यात झळकल्यानंतर या कुटुंबाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. कुटुंबासमवेत हे दांपत्य आपल्या शेतात कांदा काढणीचे काम करीत होते.

त्याचवेळी ही ‘गुड न्यूज’ त्यांना मिळाली आणि शेतकरी कुटुंबातील या दांपत्याने शेतातच आनंदोत्सव साजरा केला. लग्न झाल्यापासून केवळ पोलीस भरतीचाच ध्यास घेतलेल्या या दांपत्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही व आनंदाच्या भरात तुषार याने पत्नीला चक्क उचलून घेत जल्लोष केला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय