कोल्हापूर / यश रुकडीकर : कोल्हापूर जिल्ह्यात याही वर्षी महापुरामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कागार,
■ आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
१. २०१९च्या धर्तीवर पूरग्रस्तांना संपूर्ण कर्जमाफी करा.
२. पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे विनाअट पुनर्वसन करा.
३. पूरग्रस्त विद्यार्थांची सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा.
४. कृष्णा व पंचगंगा आदी नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळ भराव कमी करून तातडीने कमानी पुल बांधा.
५. २००५ ते २०२१ पर्यंत ४मोठे महापूर आले आहेत. या महापुरामुळे नदीकाठची अनेक गावे उध्वस्त झाली आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तातडीने अभ्यासगट नेमून त्यावर त्वरित अंबलबजावणी करावी.
६. महापुरामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योगधंदे यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटार वाहून गेल्या आहेत. विहिरी खचलेल्या आहेत. शेडनेट मोडून पडलेल्या आहेत. तसेच यंत्रमाग धारकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यासर्वांना तातडीने विनाअट सरकारने नुकसान भरपाई द्यावी.
७. महापूरचे पाणी ज्या गावात गेले आहे त्या संपूर्ण गावाला पूरग्रस्त गाव म्हणून घोशित करून सरसकट सर्वांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे.
८. सामाईक खातेदार असणाऱ्या कर्जदारांचे पंचनामे होत नसल्याने कर्ज खाते ग्राह्य धरून नुकसान भरपाई द्यावी.
९. ज्या शेतकऱ्यांनी कृषी विमा उतरलेला आहे, त्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई म्हणून विम्याची संपूर्ण रक्कम देण्याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात यावे.
यावेळी संदीप जगताप, जालिंदर पाटील, सावकार माद नाईक, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, राजेंद्र गड्डमवार, अजित पोवार, राम शिंदे, विठ्ठल मोरे, किरण भोसले, तानाजी देसाई, दिपक पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.