Thursday, January 23, 2025

हिरकणी साहित्य गौरव समूहाचे दुसरे आँनलाईन काव्यसंमेलन संपन्न

मुंबई : आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या हिरकणी साहित्य गौरव समूहाचे दुसऱ्या ऑनलाईन काव्यसंमेलन राखी पौर्णिमेच्या निमित्ताने घेण्यात आले. हिरकणी साहित्य समुहाच्या सर्वेसर्वा संस्थापिका ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती वनमाला पाटील यांच्या आयोजनाखाली ऑनलाइन काव्यसंमेलन घेण्यात आले. 

संमेलनासाठी संमेलनाध्यक्षा म्हणून कवयित्री माननीय चंदन सुशील तरवडे  कोपरगाव यांची निवड करण्यात आली होती. तसेच प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री छाया पाटील यांना आमंत्रित करण्यात आले. व संस्थेच्या संस्थापिका श्रीमती वनमाला पाटील यांच्या सहकार्याने उपस्थितीने कार्यक्रम बहारदार झाला.  

संमेलनाचे सूत्रसंचालिका राजश्री मराठे हैदराबाद, वर्षा फटकाळे, वराडे ठाणे

यांनी आपल्या मधूर वाणींने कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाची सुरूवात अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी दिपप्रज्वलाने करण्यात आली. राजश्री मराठे यांनी आपल्या गोड आवाजात ईशस्तवन सादर केले तसेच वर्षाताईंनी सुमधुर स्वागत गीताने कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत केले.

काव्यसंमेलनात कवयित्री निशा कापडे, प्रा.डाॅ.विद्या ठवकर, अनुराधा देहाडराय, अनिता कांबळे, प्रतिमा काळे, डाॅ.शीतल मालुसरे, संध्याराणी कोल्हे, वंदना धाकडे, स्नेहलता सुभाष पाटील, शिल्पा जैन, अनुपमा तवर, अमिता करमरकर, उज्वला शिंदे, विजयालक्ष्मी गोरे, ऋचा महाबळ अशा अनेक कवयित्रींनी आपल्या अप्रतिम काव्यरचना  सादर करुन काव्यसंमेलनाला खूपच रंगत आणली.

काव्यसंमेलनात प्रत्येक कवितेला वनमाला पाटील व चंदन तरवडे व छायाताईंनी  भरभरून दाद देऊन कौतुक केले. प्रमुख अतिथी छायाताई आपल्या मधूर वाणीने सर्व हिरकणींना त्यांच्या काव्याला दाद देऊन कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात कवयित्री चंदन तरवडे यांनी सांगितले की, साहित्यिक क्षेत्रात महिला कोठेही कमी नाही. श्रीमती वनमाला पाटील ताईंनी सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील हिरकणींना शोधून त्यांना स्थान देऊन आपल्या सोबत घेऊन साहित्यिक क्षेत्रात भरारी घेण्याचे एक अनमोल कार्य केले आहे.

वनमाला पाटीय यांनी सर्व हिरकणींचे आभार मानले व सुत्रसंचालिका वर्षा फटकाळे वराडे आणि राजश्री मराठे यांनी सर्वांच्या कवितांचे खूप कौतुक करून त्यांच्यासाठी त्वरित चारोळी लिहून काव्यात्मक प्रोत्साहन दिले. राजश्री मराठे यांनी गोड वाणीतून विठ्ठल भजनाने काव्यसंमेलनाची सांगता केली.

– प्रियांका पवार


Related Articles

- Advertisement -

Latest Articles