Friday, May 3, 2024
Homeलाइफस्टाइलआरोग्य : सावधान! 'ही' 5 लक्षणे सांगतात शरीरात वाढला कोलेस्ट्रॉल; दुष्परिणामही जाणून...

आरोग्य : सावधान! ‘ही’ 5 लक्षणे सांगतात शरीरात वाढला कोलेस्ट्रॉल; दुष्परिणामही जाणून घ्या

जर कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त वाढले तर ते प्राणघातक (Signs of High Cholesterol) ठरू शकते. उच्च कोलेस्ट्रॉलची काही चिन्हे डोळे, पाय आणि जिभेवर दिसतात ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात.ही चिन्हे हलक्यात घेऊ नयेत अन्यथा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तुम्हाला कोलेस्टेरॉलची काही लक्षणे देखील माहिती असणे आवश्यक आहे. कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ आहे जो आपल्या शरीराचे कार्य योग्य राखण्यासाठी आवश्यक आहे. जर त्याचे प्रमाण सामान्य प्रमाणापेक्षा जास्त असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

Signs of High Cholesterol शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त वाढल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कोलेस्टेरॉलला सायलेंट किलर देखील म्हणतात. आजच्या काळात उच्च कोलेस्टेरॉलच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक हृदयविकाराचे रुग्ण बनत आहेत. हा धोकादायक ट्रेंड वाढत आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा कोलेस्ट्रॉल मर्यादेपलीकडे वाढते तेव्हा शरीरात काही लक्षणे दिसतात. सामान्यतः लोक उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे ओळखण्यात चुका करतात. योग्य वेळी आढळून न आल्यास कोलेस्टेरॉल धमन्या बंद पाडतो आणि योग्य प्रमाणात रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते जर कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप वाढले तर डोळ्ंयाभोवती गाठ तयार होऊ शकते.

कोलेस्टेरॉलच्या लक्षणात हात आणि पाय सुन्न होणे देखील समाविष्ट आहे. शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढल्यास रक्तप्रवाहात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे हात पाय सुन्न होण्याची समस्या उद्भवू शकते. उच्च कोलेस्टेरॉलच्या रुग्णांची समस्या मर्यादेपलीकडे वाढल्यास जिभेचा रंगही बदलू शकतो. जर तुमच्या जिभेचा रंग बदलला असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

कोलेस्टेरॉल अनियंत्रित झाल्यास त्याची लक्षणे नखांवरही दिसू लागतात. तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्याने तुमच्या हाताच्या नखांचा रंग पिवळा होऊ लागतो. काहीवेळा उच्च कोलेस्टेरॉलमुळे छातीत दुखू शकते. तुम्हाला छातीत दुखत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा, अन्यथा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय