Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

Harishchandra Chavan : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे 14 नोव्हेंबर रोजी सकाळी निधन झाले. ते काही काळापासून आजारी होते. त्यांच्या निधनाने राज्यातील भाजप कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही दुःखद घटना घडल्याने भाजप व त्यांच्या समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.

---Advertisement---

हरिश्चंद्र चव्हाण यांनी मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतही त्यांनी विविध पदे भूषवली होती. एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे चव्हाण यांना भाजपने 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी न दिली होती, तरीही ते पक्षासाठी कार्यरत राहिले.

हरिश्चंद्र चव्हाण यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पवार यांचा 2 लाख 47 हजार मतांनी पराभव केला. 2019 मध्ये भारती पवार भाजपमध्ये आल्या , 2019 मध्ये भाजपने उमेदवारी भारती पवार यांना दिली, ज्यांनी त्या वर्षी मोठ्या मतांनी विजय मिळवला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी 1 लाख 98 हजार 779 मतांनी विजय मिळवला होता. तर, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हरिश्चंद्र चव्हाण हे इच्छुक होते.मात्र, 2024 च्या निवडणुकीतही भाजपने भारती पवार यांनाच संधी दिली.

---Advertisement---

यंदाच्या निवडणुकीतही हरिश्चंद्र चव्हाण इच्छुक होते. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता, परंतु आरोग्याच्या कारणास्तव शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

Harishchandra Chavan

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles