महाराष्ट्र जनभूमी : उत्तर प्रदेश मधील हाथरस मधील दलित मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येने देश हादरला आहे. मात्र सोशल मीडियावर हाथरस मधील घटनेतील पीडिता म्हणून दुसऱ्याच मुलीचा फोटो शेअर केला जात आहे.
हाथरस मधील घटनेतील पीडिता समजून सोशल मीडियावर ज्या मुलीचा फोटो शेअर केला जात आहे, ती मुलगी चंदीगड येथील असून 2018 मध्ये तिचा मृत्यू झालेला आहे. हाथरस येथील घटनेचा आणि त्या मुलीची काही संबंध नाही.
त्या फोटोतील मुलीचा चंदिगड येथील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी तिच्या फोटोसह एक मोहीम चालविली होती. परंतु, आता तो फोटो हाथरस प्रकरणाशी जोडून शेयर केला जात आहे.
तसेच, अशा प्रकारच्या घटनांमध्ये त्या मुलीची कुटुंबाची माहिती गुपित ठेवणे गरजेचे असते, या अगोदर काही प्रकरणामध्ये नाव उघड केल्याने न्यायालयाने माध्यमांना मोठा दंड ठोठावला होता.