Saturday, May 11, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरीत अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू ; नातेवाईक म्हणाले मृतदेह नको...

पिंपरीत अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू ; नातेवाईक म्हणाले मृतदेह नको !

पुणे : किवळे येथील अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेतीलमृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आणलेले आहेत. निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही, आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

तसेच रात्री ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात तणावाचे वातावरण आहे.

बंगळूर मुंबई महामार्गावरील किवळेमध्ये सोमवारी सायंकाळी होर्डिंग पाच जणांचा बळी गेला आहे. या घटनेनंतर जखमी असणाऱ्याना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते उपचार सुरू असतानाच पाच जणांचा मृत्यू झाला. घटना समजल्यानंतर मृतांची नातेवाईक वायसीएम रुग्णालयात पोहोचले. विविध राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी दोशींवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास रुग्णाच्या नातेवाईकांनी विरोध केला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय