Thursday, December 5, 2024
Homeराज्यअंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द ; परिक्षांंबाबतचा निर्णय विद्यार्थ्यांकडे. बॅकलॉगबाबत प्रतिक्षाच.

अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द ; परिक्षांंबाबतचा निर्णय विद्यार्थ्यांकडे. बॅकलॉगबाबत प्रतिक्षाच.

(प्रतिनिधी) :- अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यासंदर्भात शासन आदेश काढला. निर्णय पुढीलप्रमाणे,

अव्यावसायिक (पारंपारीक) अभ्यासक्रम :- 

१. मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील/वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल घोषित करण्यात येणार.

२. तसेच मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम सत्रातील/वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येणार. अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोणत्या महिन्यात घेता येऊ शकतील, याची कोव्हिड -१९ च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन, तसेच संबंधित जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती निवारण प्राधिकरण यांचेशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी निर्णय घेण्यात येणार व त्यानुसार वेळापत्रक जाहिर केले जाणार .

 ३. ज्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग आहे, त्यांच्या बॅकलॉगच्या विषयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठांचे कुलगुरु व संबंधित अधिकारी यांची शासनस्तरावर बैठक घेऊन विचारविनिमय करुन निर्णय घेण्यात येणार आहे.

अंतिम वर्षाच्या परिक्षा संदर्भात मोठा निर्णय; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली माहिती.

व्यावसायिक अभ्यासक्रम :-  

           अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुकला, प्लॅनिंग, संगणकशास्त्र, विधी, शारीरीक शिक्षण, अध्यापन शास्त्र याबाबत राज्यातील कोव्हिड -१ ९ ची परिस्थिती विचारात घेता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या/अंतिम वर्षांच्या परीक्षा घेता येणार नाहीत. त्या विद्यार्थ्यांकरिता अव्यावसायिक अभ्यासक्रमाप्रमाणेच कार्यवाही करण्यात येणार आहे, असा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

              त्यास मान्यता देण्याची विनंती संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संबंधित शिखर संस्थेस करण्यात येणार आहे. त्याबाबत स्वतंत्ररित्या कळविले जाणार आहे.

कृषी विद्यापीठ :- 

           कृषी विद्यापीठांचा या निर्णयामध्ये समावेश नाही.

संबंधित लेख

लोकप्रिय