Thursday, December 12, 2024
Homeग्रामीणबांधावर आणून देणारांनी खते दुकानात सुद्धा ठेवली नाहीत - सखाराम बोबडे पडेगावकर

बांधावर आणून देणारांनी खते दुकानात सुद्धा ठेवली नाहीत – सखाराम बोबडे पडेगावकर

(गंगाखेड) :- पेरणी च्या काळात बांधावर आणून देतो अशा वल्गना करणाऱ्या सरकारने आवश्यक असलेल्या पेरणीच्या काळात खत, बियाणे व कीटकनाशके औषधे दुकानात सुद्धा ठेवली नाहीत अशी प्रतीक्रीया धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली. ते बाजारातील युरिया खत व कीटकनाशके टंचाईच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

     

       पुढे बोलताना ते म्हणाले की, पेरणीपूर्वी या सरकारने ऑनलाइन खते बियाणे व कीटकनाशके नोंदणीचे गुर्हाळ चालवले. मागील वर्षी चा कापूस घेऊ शकत नाहीत यावरून शेतकऱ्यांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. सरकार बियाणे, खते बांधावर आणून देईल अशा आशेने शेतकरी घरीच बसले पण बांधावरच काय या सरकारने कृषी केंद्रावर सुद्धा बियाणे, खते आणि कीटकनाशके ठेवली नाहीत. खत उत्पादक कंपन्यांचे मर्जी सांभाळणारे सरकार जाणून-बुजून शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. स्वतःच्या पक्षाचे समर्थक असलेल्या दुकानदाराकडे पाहीजे तेव्हा कीटकनाशके उपलब्ध असून ग्रामीण भागात लाॅकडाऊन च्या काळात हि जास्त भावाने विकले जात आहेत. सरकारच्या आशीर्वादाने सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले.

      एकूणच सध्या खतासाठी महाराष्ट्रात जागोजागी शेतकऱ्यांना लाईन लावण्याची वेळ आली आहे. शासकीय खर्चाने वृत्तपत्र व टीव्हीवरील जाहिरातीत हे सरकार मात्र स्वतःला शेतकर्‍यांचे सरकार असल्याचं घोषित करत असून हे शेतकऱ्यांचे सरकार नसून इतर पीकनाशक सरकार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय