Friday, May 3, 2024
Homeकृषीभारताच्या हरित क्रांतीचा जनक काळाच्या पडद्याआड; एमएस स्वामीनाथन यांनी 98 व्या वर्षी...

भारताच्या हरित क्रांतीचा जनक काळाच्या पडद्याआड; एमएस स्वामीनाथन यांनी 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चेन्नई : भारताला कृषि क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा तसेच भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांचे गुरुवारी चेन्नई येथे निधन झाले. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात MSSRF च्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. मधुरा स्वामीनाथन आणि नित्या स्वामीनाथन अशा तीन कन्या आहेत. चेन्नईतील तेनमपेट येथील त्यांच्या निवासस्थानी एमएस स्वामीनाथन यांचे निधन झाले. वयोमानापरत्वे जडलेल्या आजारांमुळे आज सकाळी ११.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (MS Swaminathan passes away)

भारत मातेच्या महान सुपुत्राचे निधन – CM

‘भारताला कृषि क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा. कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा. शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या महान सुपुत्र आज भारत मातेने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, भारताची कृषी क्षेत्रातील, मृद व जलसंधारण क्षेत्रातील प्रगती ही डॉ. स्वामीनाथन यांच्या अखंड साधनेचे फलित आहे. त्यांच्या संशोधनाच्या आधारावर भारताने अन्नधान्य स्वयंपूर्णता प्राप्त केली. डॉ. स्वामीनाथन यांनी शेतमजूर, शेतकरी ते कार्पोरेट फार्मिंग याविषयी त्यांनी मांडणी केली. भारतीय हरितक्रांतीचे जनक हे बिरूद त्यांनी अखंडपणे एक व्रत म्हणून सांभाळले. जागतिक स्तरावर डॉ. स्वामीनाथन ही आपल्या भारतीयांची एक महान बौद्धिक संपदा म्हणून पाहिले जात होते. अशा या भारत मातेच्या महान सुपुत्राचे निधन देशाचे मोठे नुकसान आहे.



कृषी क्षेत्रात विविध प्रयोग…


डॉ. स्वामीनाथन यांनी भारतीय शेतीत क्रांती घडवून आणली. त्यांनी विविध प्रयोग केले. कमी खतं वापरून अधिक उत्पादन घेता येईल याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलं. तसेच भारतात उच्च प्रतीच्या गव्हाचं उत्पादन घेतलं. १९६० मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेत संशोधक म्हणून कार्यरत असताना त्यांना डॉ. बोरलॉग यांनी विकसित केलेल्या गव्हाच्या मेक्सिकन ड्वार्फ या नवीन प्रजातीविषयी माहिती मिळाली. एम. एस. स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव मन्कोम्बू सम्बासीवन होते. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आयपीएस अधिकारी म्हणून नोकरीची ऑफर आली होती. मात्र, ती न स्वीकारता ते नेदरलँडला शेतीविषयक अभ्यासासाठी गेले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय