Saturday, May 4, 2024
HomeNewsबापरे ! जगातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक, धोका कायम

बापरे ! जगातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक, धोका कायम

(प्रतिनिधी भिमराव सरोदे ):जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी जेव्हा जागा होतो…हो अमेरिकेतील (America) हवाई बेटांवर असलेला जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी (Volcano Video) मौना लाऊआचा (Mauna Loa ) 40 वर्षांनंतर उद्रेक झाला आहे.

रविवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 11.30 वाजता मौना लाऊआचा स्फोट झाला. या स्फोटाचे भयान वास्तव सांगणारा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सगळीकडे राख आणि वायूचे साम्राज्य पसरलं आहे. USGS च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्वालामुखीच्या लावामध्ये सर्वाधिक सल्फर डायऑक्साइड (Sulfur dioxide) आहे. याशिवाय हा लावा एका आठवड्यात हाहाकार माजवू शकतो, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

ज्वालामुखीमध्ये आणखी किमान डझनभर उद्रेक होऊ शकतात. त्याच वेळी, त्याच्या शेजारी स्थित किलोवाया देखील डिसेंबर 2021 पासून धोकादायक पातळीवर सक्रिय आहे. याचा कधीही स्फोट होऊ शकतो, असंही सांगण्यात येत आहे.हवाईमध्ये जगातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ज्वालामुखी आहेत. इथं असणाऱ्या आणि सध्या उद्रेक झालेल्या मौना लोआ या ज्वालामुखीची उंची 13600 फूट इतकी आहे. 1984 मध्ये त्याचा उद्रेक झाला होता. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ज्वालामुखी स्पेनमध्ये आहे.

Lic

Lic

LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय