Saturday, May 18, 2024
Homeकृषीशेतकरी एकजूट करून हमीभाव लढा, वनजमीन लढा तीव्र करणार - ॲड. हिरालाल...

शेतकरी एकजूट करून हमीभाव लढा, वनजमीन लढा तीव्र करणार – ॲड. हिरालाल परदेशी


जिल्हाध्यक्ष पदी देविदास भोपळे तर सरचिटणीस पदी विजय दराडे

नांदगाव : महाराष्ट्र राज्य किसान सभा नाशिक जिल्ह्या अधिवेशन 15 मे 2022 रोजी नांदगाव येथे  गुप्ता लान्स येथे आयोजित करण्यात आले होते. सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह ते गुप्ता लान्स पर्यन्त रॅली काढण्यात आली. अधिवेशन साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड हिरालाल परदेशी (धुळे) उपस्थित होते. त्यांनी शेतकरी दिल्लीत शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात वर्षभर लढला. किसान सभा त्यात सहभागी होती. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने दिल्लीत गेलो. राज्यभर आंदोलन केले होते. आता लढा हमीभाव साठी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी देऊ या. शिरपूर ते धुळे वन जमीन व गायरान जमिनीसाठी पायी मोर्चा काढून आम्ही आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिला. नाशिक जिल्ह्यात सुद्धा वन, गायरान जमीन बाबत तीव्र लढा एकजूट करून लढू या. महाराष्ट्र राज्य किसान सभा चे 22 वे राज्य अधिवेशन शिरपूर येथे 28, 29 मे रोजी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील किसान सभेच्या शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

या अधिवेशनाचे अध्यक्ष स्थानी भाकप किसान सभा राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले होते. त्यांनी शेतकरी प्रश्नावर या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा गावपातळीवर होण्यासाठी विका सोसायटी मजबूत झाल्या पाहिजेत. नाशिक जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत आल्यामुळे 12 लाख ठेवीदार, शेतकरी अडचणीत आला आहे. नाशिक जिल्ह्यातील सहकार् चळवळ ही शेतकऱ्यांचा विकासासाठी महत्वाची आहे. ती बळकट करण्यासाठी किसान सभा लढेल. नाशिक जिल्ह्या शेतकरी चळवळ चा ऐतिहासिक करणारा आहे. कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचा चळवळीचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करू या असे आवाहन केले. 

अधिवेशनात शेती, शेतकरी प्रश्नावर चर्चा करण्यात  आली. तसेच पुढील काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन निश्चित्त करण्यासाठी विविध ठराव मांडण्यात आले. मागील अधिवेशन नंतर आज पर्यँचे झालेल्या जिल्यातील आंदोलन चा आढावा जिल्हा सचिव देविदास भोपळे मांडला पुढील तीन वर्षासाठी नवीन पदाधिकारी निवड करण्यात आली.

यात जिल्हाध्यक्ष पदी देविदास भोपळे, सरचिटणीस पदी  विजय दराडे कार्याध्यक्ष पदी भास्कर शिंदे तर उपाध्यक्ष पदी नामदेव बोराडे (नाशिक), ॲड. दत्तात्रय गांगुर्डे (चांदवड), शांताराम पवार (नांदगाव) , सहसचिव किरण डावखर, खजिनदार निवृत्ती कसबे, तर जिल्हा संघटक म्हणून सुखदेव केदारे तर महिला किसान सभा नाशिक जिल्हा अध्यक्षपदी ॲड. साधना गायकवाड यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. 

जिल्हा कमिटी पदी रंगनाथ जिरे, मधुकर मुठाळ, जगन माळी, प्रवीण पाटील, राहुल वाघ, प्रकाश भावसार, नामदेव ठाकरे, राजू जाधव, धर्मा चव्हाण, विमल पवार, जीभाऊ वाघ, रामचंद्र टिळे, वित्तल घुले, यांची निवड झाली.

अधिवेशन स्थळाला दिवंगत नेते किसान सभेचे राज्य अध्यक्ष राहिलेले कॉम्रेड माधवराव गायकवाड नगर नाव देण्यात आले होते तर किसान सभा नांदगाव तालुका माजी अध्यक्ष दिवंगत कॉम्रेड शंकर गंभीरे, व किसान सभा नेते दिवंगत फकिरा पवार प्रवेशद्वार नाव देण्यात आले होते. किसान सभा राज्य सरचिटणीस दिवंगत कॉम्रेड नामदेवराव गावडे यांचे नाव देण्यात आले. तसेच शिरपूर येथे 28, 29 मे 2022 रोजी राज्य किसान सभेचे राज्य अधिवेशनासाठी 20 प्रतिनिधी निवड करण्यात करण्यात आली.

किसान सभा अधिवेशन ठराव पुढीलप्रमाणे : 

 

१. शेतमालाला हमीभाव देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा.

२. केंद्र शासनाने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू कराव्या.

३. नांदगाव तालुक्याला नारपार चे पाणी मिळावे.

४. राज्यशासनाने नियमितपणे पिकं कर्ज भरणाऱ्यानां ५० हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे यात २०१७ – २०१८, २०१८ – २०१९ व २०१९ – २०२० या आर्थिक वर्षांसाठीचाच यात समावेश आहे मात्र नाशिक जिल्हा बँक अडचणीत असल्यामुळे वरील आर्थिक वर्षात बँकेकडून पिककर्ज नगण्य प्रमाणात वाटप केले आहे, शासनाने याची दखल घेऊन सन २०२० – २०२१ मध्ये वाटप केलल्या पिककर्जधारकांना याचा लाभ घेता यावा यासाठी आर्थिक वर्ष २०२० – २०२१चा समावेश यात करावा. तसेच २०१६ – २०१७ मध्ये महात्मा फुले कर्जमुक्ती योजना दिली होती. मात्र त्यावर्षी नियमित कर्जदारांनी कर्ज भरले तरी त्यांना सदर कर्जमुक्तीचा लाभ झाला नाही म्हणून २०१६ – २०१७ मधील नियमित कर्ज परतावा करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या ५० हजार अनुदानाचा लाभ द्यावा.

५. कसत असलेल्या वनजमिनी व गायरान जमिनीधारकांच्या नावावर करा व वनजमिनी धारकांना कर्जपुरवठा व इतर योजनांचा लाभ द्यावा.

६. शेतकऱ्यांच्या बांधावरील कामाचा समावेश रोजगार हमी योजनेत करून शेतकऱ्यांना मदत करावी.

७.पीकविमा बाबत शेतकरी हिताचे नियम करावे तसेच नांदगाव तालुक्यातील पिकविमापासून वंचितांना त्वरित पीकविमा लाभ घ्यावा .

८. शेतकऱ्यांना गाव पातळीवर थेट कर्जपुरवठा करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटी मजबूत करा.

९. आशिया खंडात शेतकऱ्यांना सर्वात जास्त कर्ज पुरवठा करणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत आली आहे. ती पुन्हा सुरळित व्यवहारात सुरू होण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने ७२८ कोटी रुपये बँकेच्या भागभांडवलामध्ये गुंतवणूक करून शेतकऱ्यांना व ठेवीदारांना दिलासा द्यावा, बँक अडचणीत आणणाऱ्या वर  कठोरपणे  कारवाई करावी. लोक प्रतिनिधी, बँकेचे आजी माजी संचालक यांनी घेतलेले कर्ज अथवा संस्थेला घेतलेले कर्ज त्वरित भरावे अन्यथा किसान सभा आंदोलन करेल.

१०. शेतकरी आंदोलनातील दाखल गुन्हे महाराष्ट्र शासनाने त्वरित मागे घ्यावे. समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी आंदोलनावेळी समितीचे राज्य समन्वयक व किसान सभा नेते कॉम्रेड राजू देसले यांचा आडगाव नाशिक पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल त्वरित परत करावा .

११. समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना मालवाहतूक दळवळणासाठी ठीकठिकाणी बोगदे तयार करावे व महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड होई पर्यंत समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करू नये.

१२. कांद्याला 3 हजार रुपये हमी भाव द्या.

१३. शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा झालाच पाहिजे.

१४. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढ करून महागाई करणारे केंद्र सरकार चा निषेध करण्यात आला.

१५. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून खरे प्रश्नावर दुर्लक्ष करणारे केंद्र सरकार चा निषेध करीत आहोत.

आदी ठराव ॲड. दत्तात्रय गांगुर्डे यांनी मांडले. नामदेव बोराडे यांनी सर्वांच्या मताने अनुमोदन दिले. 28, 29 मे राज्य अधिवेशन शिरपूर साठी 25 प्रतिनिधी निवड करण्यात आली. 

अधिवेशन यशस्वी होण्यासाठी देवीदास भोपळे, नामदेव ठाकरे, शांताराम पवार, राजूजाधव, भास्कर पवार, धर्मा चव्हाण, जीभाऊ वाघ, प्रकाश भावसार, छबु पुरकर, रामुतात्या ठोंबरे, संजय पवार, योगेश जाधव, दत्तू अहिरे आदी 8 तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय दराडे यांनी केले. प्रास्तविक भास्कर शिंदे यांनी केले. या प्रसंगी अड साधना गायकवाड, जेष्ठ नेते दामू अण्णा पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुनीता कुलकर्णी यांनी आयटक च्या शुभेच्छा पर मार्गदर्शन केले. अधिवेशन उदघाटन 22 वे राज्य अधिवेशन पोस्टर प्रकाशन करून करण्यात आले. आभार भीमा पाटील यांनी मानले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय