Saturday, May 4, 2024
Homeग्रामीणआदर्शवत ! गोविंद आणि कोमल यांनी लग्नात पाहुण्यांना वितरित केल्या शिवरायांच्या जीवनावरील...

आदर्शवत ! गोविंद आणि कोमल यांनी लग्नात पाहुण्यांना वितरित केल्या शिवरायांच्या जीवनावरील १ हजार पुस्तिका

पुरोगामी आदर्श परंपरा निर्माण केल्याबद्दल वधू-वरांचे सर्वत्र कौतुक

बीड : गोविंद निरडे आणि कोमल वरकले यांचा विवाह सोहळा आज दिनांक १३ मे रोजी पहाडी पारगाव येथे पार पडला. लग्न तर अनेक होतात; परंतु या लग्नाची सर्वत्र  चर्चा होत आहे. त्याचे कारण असे की, वधू-वर यांनी एक आदर्श परंपरा निर्माण केली आहे. 

लग्नात उपस्थित पाहुण्यांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तिकेच्या  १ हजार प्रति वितरित केल्या.

पुण्यात नोकरी शोधताय ? ‘या’ 9 ठिकाणी सरकारी, निमसरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज

अकोला जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !

गोविंद हा धारूर तालुक्यातील कचारवाडी येथील रहिवासी असून, त्याने विद्यार्थी दशेत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या डाव्या विद्यार्थी संघटनेत कार्य केलेले आहे. चळवळ अंगी भिनल्याने कोणत्याही कृतीत आपण पुरोगामीत्व पुढे नेले पाहिजे, हीच त्याची धारणा आहे. म्हणून त्याने स्वतःच्या लग्नात पुस्तक भेट देण्याचा उपक्रम राबविला. 

इतर लग्नात वधू-वर पंगतीत जेवणाचे पदार्थ वाढतात. परंतु या लग्नातल्या पंगतीत गोविंद आणि कोमल यांनी पाहुण्यांना शिवरायांच्या जीवनावरील पुस्तिका वितरीत केल्या. या विवाह सोहळ्यास तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यांनाही पुस्तक भेट दिले गेले. या चांगल्या उपक्रमाबद्दल गोविंद आणि कोमल यांच्यासह निरडे आणि वरकले परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

मोठी भरती : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत तब्बल 650 जागांसाठी भरती, 20 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय