Thursday, May 2, 2024
Homeआंतरराष्ट्रीयFarmers protest-व्हिडिओ:संपूर्ण युरोपमध्ये शेतकरी आंदोलन: रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावले

Farmers protest-व्हिडिओ:संपूर्ण युरोपमध्ये शेतकरी आंदोलन: रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावले

अनेक देशातील महामार्ग,बंदरे,शहरांची केली नाकेबंदी


माद्रिद:दि.11-युरोप मधील एकूण 10 देशात शेतकऱ्यांनी युरोपीयन युनियनच्या कृषी धोरणाविरोधात आंदोलन पुकारले आहे
पर्यावरणीय नियमांपासून ते आर्थिक अडचणींपर्यंत अनेक मुद्द्यांवर निदर्शने करत आहेत. त्यांचा सरकारसोबत थेट संघर्ष सुरु आहे. शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या ट्रॅक्टरसह आंदोलन सुरु केले आहे.

पोलंड,इटली,पोर्तुगाल,जर्मनी,फ्रांस,स्पेन,रोमानिया,ग्रीस,नेदरलँड्ससह विविध देशातील प्रमुख शहरात शेतकऱ्यांनी रस्त्यावर ट्रॅक्टर्स आडवेतिडवे उभे करुन वाहतूक रोखली आहे.प्रमुख औद्योगिक शहराकडे जाणारे रस्ते आंदोलकांनी रोखले आहेत, बंदरे आणि वाहतूकीची नाकेबंदी केल्याने दळणवळन ठप्प झाले आहे.

युरोपियन संसदे समोर आंदोलक पोलीस आमने

युरोपमधील एखाद्या प्रांतात नव्हे तर सर्वत्र सुरु आहे.परिणामी त्याची व्याप्ती वाढली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी युरोपीयन सरकारवर दबाव निर्माण झाला आहे. सरकारे शेतकऱ्यांच्या संघटनाबरोबर बोलणी करत आहेत,असे ‘द गार्डीयन’ने वृत्त प्रसारित केले आहे.

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे वाढलेल्या इंधन,खत आणि वाहतुकीच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.शेतमालाला पुरेशी किंमत न देता खाद्यपदार्थांच्या किमतींवर अंकुश ठेवून महागाई कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक भारात भर पडली आहे.त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.सरकारे युरोप बाहेरील देशातून शेतमाल,कृषी उत्पादने स्वस्त दरात आयात करत आहे,त्यामुळे युरोपमधील शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान युक्रेन युद्धानंतर होत आहे,त्यामुळे युरोप बाहेरील आयात बंद करून इंधन,खते,कर्जे यावर अनुदान द्यावे,अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय