Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमाझा कचरा माझी जबाबदारी अशी भावना सर्वांनी जोपासावी - पद्मश्री मिलिंद कांबळे

माझा कचरा माझी जबाबदारी अशी भावना सर्वांनी जोपासावी – पद्मश्री मिलिंद कांबळे

डिक्की च्या उद्योजकांनी घेतली स्वच्छतेची शपथ

पुणे/क्रांतिकुमार कडुलकर : दि.०१
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जंयती निमीत्य १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सर्व नागरिकांनी एकत्रितपणे स्वच्छतेसाठी १ तास श्रमदानाचे आवाहन केले होते त्यानुसार जयंतीच्या पूर्वसंध्येला बापूंना ‘स्वछ्चांजली ‘अर्पन करण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की ) च्या उद्योजककांनी आज सकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यातील पुतळा परिसरात स्वच्छता अभियान राबवून ,स्वच्छता हीच सेवेची सामूहिक शपथ घेतली .यावेळी डिक्की चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी सर्वांना शपथ दिली.



यावेळी समाजातील सर्व घटकांनी महात्मा गांधी यांचा स्वछतेचा व सेवेचा आदर्श घेतला पाहिजे .माझा कचरा माझी जबाबदारी अशी भावना सर्वांनी जोपासली पाहिजे असे आवाहन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की ) चे संस्थापक अध्यक्ष व आय आय एम जम्मू चे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी केले. यावेळी भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर पुतळा , जिल्हाधीकारी कार्यालयासमोर व परीसरात स्वच्छता मोहीम राबवली.



यावेळी डिक्की च्या महिला समन्वयक सीमा कांबळे ,प्रदेशाध्यक्ष मुकुंद कमलाकर , पुणे विभाग अध्यक्ष राजू साळवे , डिक्की युवा आघाडी मैत्रेय कांबळे , पश्चिम भारत प्रमुख अविनाश जगताप , सचिन दिघोळकर , प्रसन्न भिसे, गौतम भोसले , उज्ज्वला पवार , स्मिता कांबळे , शोभा कमलाकर, प्रशांत गवळी यासह डिक्की चे उद्योजक व उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित होते .

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय