Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याNarendra Modi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत...

Narendra Modi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

Prime Minister Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. भाजप तिसऱ्यांदा देशात सत्तेत आल्यास देशाचे संविधान बदलून टाकले जाईल अशी भीती इंडिया आघाडीकडून व्यक्त केली जात आहे. तसेच देशाचे संविधान देखील धोक्यात असल्याची टीका भाजपवर सातत्याने करण्यात येत आहे. या आरोपांवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांना प्रत्यूत्तर दिले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान भाजपाला मोडीत काढायचे आहे. हे संविधान बदलायचे आहे. भाजप तिसऱ्यांदा देशात सत्तेत आल्यास ते संविधान बदलतील अशी सध्या सर्वत्र चर्चा असून विरोधक देखील भाजपवर टीका करत आहे. या अगोदर संविधान बदला बाबतचे विधान देखील अनेकदा भाजपच्याच नेत्यांनी आणि खासदारांनी केले आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. असे असताना आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संविधान बदलाचा दावा खोडून काढला आहे.

राजस्थानमध्ये (११ एप्रिल) रोजी आयोजित रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत म्हणतं जेव्हा निवडणूक येते तेव्हा संविधानाच्या नावावर खोटे बोलणे ही इंडिया आघाडीची फॅशन झाल्याची टीका त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ज्या काँग्रेसने देशात आणीबाणी लावली, संविधान संपवण्याचा प्रयत्न केला, आज तीच काँग्रेस मला शिव्या देण्यासाठी संविधानाच्या नावाखाली खोटे बोलत आहे. एससी, एसटी, ओबीसी बंधू भगिनीशी अनेक दशकांपासून भेदभाव करणारी काँग्रेस सध्या जुनी रेकॉर्ड वाजवत असल्याचीही टीका त्यांनी केली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

संबंधित लेख

लोकप्रिय