Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पश्चिम सांगवीतील जेष्ठ नागरिकांनी घेतली मतदानाची शपथ

PCMC : पश्चिम सांगवीतील जेष्ठ नागरिकांनी घेतली मतदानाची शपथ

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडूलकर : सांगवी येथे मतदान जनजागृती राबविण्यात आली यावेळी आम्ही सर्वजण लोकशाही जागृत करण्याच्या दृष्टीने आपल्या देशाप्रती प्रतिज्ञा करतो कि आम्ही मुक्त, निष्पक्षपणे व शांततेने आगामी 17 वी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये, मतदान करण्यासाठी वंश, जात, समुदाय, भाषा व इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता, आम्ही निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेत आहोत. pcmc news

पश्चिम सांगवी जेष्ठ नागरिक संघ सांगवी (pcmc) येथील सभासदांनी मासिक मीटिंगमध्ये १०० टक्के मतदानाची सामुदायिक शपथ घेतली.

सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड यांनी त्यांना शपथ दिली. शपथ देताना जोगदंड म्हणाले कि, समृध्द आणि धर्मनिरपेक्ष लोकशाहीसाठी जात, प्रांत, भाषा, असा संकुचित विचार न करता, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता १०० टक्के मतदान करू, मतदानाची किंमत नाही, मतदान मात्र करणार. अशी शपथ सर्वांनी घेतली आहे. pcmc news

सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या शपथ अभियानात सहभाग घेतला.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी सांगितले कि, आपण सर्वांनी लोकशाहीच्या उत्साहात सहभागी झाले पाहिजे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन केले.

पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक (senior citizen) महासंघाचे सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी यांनी सांगितले कि, आम्ही सर्वजण ज्येष्ठ नागरिक आहोत, त्यामुळे सकाळी सकाळी उठल्यावर लवकर मतदान करावे नाही, उन्हाळा कडक असला तरी माझ्या एका मताने काय फरक पडणार? अशी भूमिका आम्ही घेणार नाही, हा आपला संविधानिक हक्क आहे, असे मत ईश्वरलाल चौधरी व्यक्त केले.

यावेळी सांगवी पश्चिम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, प्रकाश देशमुख, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड, अशोक चव्हाण, राजाराम रोकडे, अर्जुन फासगे, शिवाजी लोखंडे, चंद्रभागा कर्डिले, शैला लक्का, श्रीमती मंगला चौधरी, श्रीमती शैलजा बांगर, रमेश राणे, चंद्रप्रभा पवार, छाया माने सह स्त्री पुरुष सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय