Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमावळ मध्ये अहिल्या रेड ब्रिग्रेडची स्थापना

मावळ मध्ये अहिल्या रेड ब्रिग्रेडची स्थापना

मावळ/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१४-मावळ तालुक्यातील महिलांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण व सामाजिक न्याय व सुरक्षितता मिळवून देण्यासाठी कॉम्रेड अहिल्या रांगणेकर रेड ब्रिगेडची स्थापना करण्यात आल्याची माहिती अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या नेत्या कॉम्रेड अपर्णा दराडे यांनी सुदुंबरे मावळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले.
संत तुकारामनगर,सुदुंबरे येथे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन सभेमध्ये महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.

पिंपरी चिंचवड शहरात गेली दहा वर्षे महिला रेड ब्रिगेडचे कार्य सुरू आहे.घरगुती अत्याचार,सार्वजनिक ठिकाणी होणारी गुंडगिरी,भाईगिरी याविरोधात तक्रार निवारण,समुदेशन केंद्र आकुर्डी येथील मुख्य कार्यालयात निरंतर सुरू आहे.या माध्यमातून आत्तापर्यंत ४०० महिलांना न्याय देण्यात आला आहे.असे अपर्णा दराडे यांनी सांगितले.

व्यसनमुक्ती,शालेय महाविद्यालयीन मुलींची सुरक्षा तसेच येथील ग्रामीण महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण केले जाईल,असे मीरा भांगे यांनी स्पष्ट केले.
संत तुकारामनगर शाखा अध्यक्षा जनाबाई जाधव यांनी महिलांनी आता भयमुक्त व्हावे,असे आवाहन केले.या मेळाव्यास १२० महिला उपस्थित होत्या.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे,अ.भा.किसान सभा पुणे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड डॉ.अमोल वाघमारे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या.
अर्चना जाधव यांनी प्रास्ताविक केले तर सोनाली जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय