Friday, May 3, 2024
Homeराजकारण‘या’ प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना ईडीची नोटीस

‘या’ प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना ईडीची नोटीस

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवली. नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी हि नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसवरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टिका केली आहे.

काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 2015 मध्ये ईडीने हे प्रकरण बंद केले होते. सत्ताधारी पक्षाला ते पटले नाही तर ईडीच्या अधिकाऱ्यांना हटवले, नवीन लोक नेमले आणि आता ते सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समन्स पाठवत आहेत. काही दिवसांपूर्वी नोटीस बजावली. आम्ही त्याचा कठोरपणे सामना करू. सोनिया गांधी ८ जूनला चौकशीसाठी जातील, राहुल गांधी मोकळे असतील तर तेही जाऊ शकतात, नाहीतर वेळ मागू शकतो. प्रत्येक उत्तर कायदेशीररित्या दिले जाईल, असे ते म्हणाले. आपल्या राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी मोदी सरकार तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज आता एडिटही करता येणार, काय आहे खासियत वाचा !

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल केली होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांवर फसवणूक आणि पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. या प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल गांधी, पक्षाचे दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि यंग इंडियन यांना आरोपी करण्यात आले आहे. 

स्वामी यांनी आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, केवळ 50 लाख रुपये देऊन, यंग इंडियन (वायआय) प्रायव्हेट लिमिटेडने काँग्रेसच्या असोसिएट जर्नल्सकडून 90.25 कोटी रुपये वसूल करण्याचा अधिकार मिळवला होता. या संदर्भात उच्च न्यायालयाकडून सोनिया आणि राहुल गांधी यांना नोटीसही बजावण्यात आली होती.

LPG गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर, बघा काय आहेत आजचे दर !

आयडीबीआय बँकेत तब्बल 1544 जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत केली वाढ, वाचा काय आहे प्रकरण !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय