Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएस.एम.जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती साजरी 

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती साजरी 

हडपसर / डॉ.अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज व संपूर्ण साधना शैक्षणिक संकुल यांच्या वतीने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन परिचयावर आधारीत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. Dr. Padma Bhushan in S M Joshi College. 136th birth anniversary celebration of Karmaveer Bhaurao Patil

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हडपसरचे लोकप्रिय आमदार व रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन चेतन तुपे उपस्थित होते. तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अमर तुपे हे उपस्थिती होते. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले की, पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्व संस्कृतीची पुण्याई, सत्य आणि सेवेचा संगम, शिक्षणाचा मूल्यात्मक सारांश आहेत. कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या समतेच्या विचारधारेवर केलेली आहे. कर्मवीर अण्णांनी स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्या मुलांना शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्यासोबत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी देखील रयत शिक्षण संस्थेच्या योगदानात मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती झालेली दिसते. त्यांनी सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी एक शिक्षण चळवळ उभी केली. 

तसेच अध्यापक महाविद्यालयातून चांगल्या दर्जाचे अध्यापक निर्माण व्हावे. याकरता अध्यापक महाविद्यालयांची उभारणी केली. शाहू महाराजांनी विविध जाती-धर्मांसाठी वेगवेगळी होस्टेल्स उभी केली. शाहू महाराजांचा आदर्श घेत अण्णांनी सर्व जाती धर्माच्या मुलांना एकाच हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय केली. कर्मवीरांनी प्रत्येक गावामध्ये, शहरात एक तरी शाळा महाविद्यालय उभे राहावे असे स्वप्न पाहिले. ते आता सत्यात उतरत आहे. आज त्यांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचा वटवृक्ष होताना दिसत आहे. एकाच वेळी सर्व संत व महापुरुषांची वैचारिक चांगुलपणा अंगिकारत स्वातंत्र्य चळवळ व सामाजिक सुधारणेमध्ये मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला झोखून देवून रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष करण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे म्हणाले की, साधना शैक्षणिक संकुल हे रयत शिक्षण संस्थेत शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत अग्रस्थानी आह़े. या शैक्षणिक संस्थेत कोणत्याही विद्यार्थ्याला फी भरता येत नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणार येणार नाही. असा संकल्प केला आह़े. कर्मवीर अण्णांचे ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे ब्रीदवाक्य होते. त्यानुसार आजच्या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी देखील हे ब्रीदवाक्य आत्मसात करून शैक्षणिक कार्य करावे. असे मत व्यक्त केले. 

रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे रयत सेवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्राकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले. 

पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रांगोळी स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वाणिज्य प्रदर्शन इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आह़े. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने विविध स्पर्धा पार पडल्या. या सर्व स्पर्धांचे प्रमुख म्हणून सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.शिल्पा शितोळे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख प्राचार्य डी.जी. जाधव यांनी करून दिली. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य सुजाता कालेकर यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नम्रता कदम आणि डॉ.अर्चना पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी साधना शैक्षणिक संकुलातील व महाविद्यालयातील प्राचार्य रोहिणी सुशीर, मुख्याध्यापिका झिनत सय्यद, मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर, उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जड़े, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय