Wednesday, May 1, 2024
Homeविशेष लेखविशेष : भूगोल विषयात ‘पोस्ट डॉक्टरेट’ मिळवणारा अकोले तालुक्यातील पहिला तरुण डॉ.नितीन...

विशेष : भूगोल विषयात ‘पोस्ट डॉक्टरेट’ मिळवणारा अकोले तालुक्यातील पहिला तरुण डॉ.नितीन मुंढे

भारत सरकार, नवी दिल्ली याद्वारे चालवलेले आतंरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था (IIPS), मुंबई यांनी डॉ.नितीन नथुराम मुंढे यांना पोस्ट-डॉक्टरेट ही शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पदवी दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी मुंबई येथे बहाल केली आहे. ही पदवी मिळवलेले डॉ. प्रा.डॉ.नितिन नथुराम मुंढे, हे मुळचे अकोले तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या राजूर या गावचे सुपुत्र आहेत. त्यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रवास हा सर्वसामान्यांना थक करणारा आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामूळे जिल्‍हापरीषेदेच्या शाळेतून त्यांचे प्राथिम शिक्षण झाले. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सर्वोदय विद्या मंदिर, राजूर येथून तर बी.ए. ॲड. मनोहरराव देशमुख महाविद्यालय, राजूर येथून पूर्ण केले. 

ते सांगतात. “इतरांप्रमाणे एक अपयश माझ्याही  वाट्याला आले होते. मी दहावीला असतांना नापास झालो त्यावेळी मला खूप वाईट वाटले होते. पण त्या अपयशा मी खचले नाही. उलट माझा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला व आयुष्यात खूप शिकायचे हा ध्यास मी घेतला. पुन्हा ऑक्टोबरमध्ये परीक्षा देऊन दहावी पास झालो.” आज डॉ. नितिन यांची शैक्षणिक प्रगती पाहिली तर आपल्याला विश्वास बसणार नाही की, हा व्यक्ती दहावीला नापास झाला असेल. पण म्हणतात ना  अपयश ही यशाची पहिली पायरी असते. तेच खरे असल्याची जाणिव होते. 

शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले डॉ. नितिन मुंढे, राजूर महाविद्यालयातून कला(Arts)शाखेतून पहिला क्रमांक, तर पुणे विद्यापीठातून भूगोल विषयात ९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. म्हणून राजूर महाविद्यालयाने त्यांचा ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून त्यांचा सन्मान देखील केला होता. पुढे बी.ए. झाल्यानंतर  M.A. Geography साठी, पुणे विद्यापीठात प्रवेश मिळाला आणि  शिक्षणाच्या माहेरघरात त्यांनी आपले पहिले पाऊल ठेवले. दुर्गम भागातून पुण्यात आल्यामुळे मनात न्यूनगंड होता. जून २००६ मध्ये  एम.ए भूगोल याविषयात विद्यापीठ रँकिंगमध्ये ७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एका ग्रामीण व दुर्गम भागातल्या युवकाचे हे यश उल्लेखनीय होते यात काहीच शंकाच नाही. पुढे एम.ए झाल्यानंतर काय करायचे हा प्रश्न मनात घोळत होता. पण त्या प्रश्नाचे उत्तर लगेच मिळाले. 

भूगोल च्या विद्यार्थ्यांना M.Sc. Geoinformatics ला प्रवेश घेता येत होता. गावाला जावून काय ? करणार म्हणून पुढे दोन वर्षात M.Sc पूर्ण केले. हे शिक्षण घेत असताना ज्ञानाच्या कक्षा आणखी रुंदावल्या. या डिग्रीमुळे तांत्रिक आणि भूगोल विषयाच्या ज्ञानात आणखी भर पडली. याच दरम्यान त्यांच्या वडीलांचे अल्पशा आजाराने सन २००७ मध्ये निधन झाले. हा अचानक बसलेला धक्का होता. परंतु स्वता:ला सावरत त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास सुरू ठेवला. सेट आणि नेट परीक्षेचा अभ्यासही चालू होता. डिसेंबर २००८ ची नेट परीक्षा ते उत्तीर्ण झाले. या एका निकालाने त्यांचे भविष्य बदलणार होते. पुढे ते सन २००९ साली S.P. कॉलेजमध्ये प्राध्यापक या पदावर रुजू झाले. हे सर्व आई वडिल आणि मोठ्या भावाने घेतलेल्या मेहनतीचे फळ होते.  डॉ.नितीन यांनी २००८ मध्येच पीएच. डी. प्रवेश मिळाला डॉ. रविंद्र जायभाय सरांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०१६ मध्ये पीएच.डी. पूर्ण केली. IIT रुरकी च्या NPTEL च्या कोर्समध्ये सरांना दोनदा सुवर्णपदक मिळाले आहे. त्यांच्या या सगळ्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र भूगोल परिषदेने त्यांना २०१७-१८ साली भूगोल विषयातील ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे.  

डॉ. मुंढे हे अकोले तालुक्यातील पहिली व्यक्ती तर सर परशुरामभाऊ महाविद्यालय (S. P. College) पुणे यांच्या शंभर वर्षाच्या इतिहासात नोकरी करत असताना भूगोल विषयात ही पदवी मिळविलेले डॉ. नितीन हे पहिलेच प्राध्यापक आहे. त्यांच्या ह्या कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातुन त्यांचे कौतुक केले जात आहे. डॉ. रविंद्र जायभाय, भूगोल विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे. आणि डॉ. विनायक सोलापूरकर, प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

संकलन/शब्दांकन : डॉ. कुंडलिक पारधी


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय