Thursday, April 18, 2024
Homeकृषीमोठी बातमी : 23 जानेवारी पासून राज्यभरातून मुंबईच्या दिशेने सुरु होणार वाहन...

मोठी बातमी : 23 जानेवारी पासून राज्यभरातून मुंबईच्या दिशेने सुरु होणार वाहन मोर्चा

मुंबई : देशातील शेतकरी आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये तोडगा निघताना दिसत नाही. महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चाच्या हाकेला प्रतिसाद देत राजधानीमध्ये धरणे आंदोलनाची जोरदार तयारी ‘शेतकरी – कामगार संयुक्त कृती समिती’ने केली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने मुंबईकडे 23 जानेवारी पासून मुंबईच्या दिशेने वाहन मोर्चा घेऊन पोहोचणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली.

शेतकरी कायदे रद्द करा, कामगार कायदे रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. 24 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे हजारो शेतकरी धरणे आंदोलन करणार आहेत. तर 25 जानेवारी रोजी हजारोंच्या संख्येने शेतकरी राजभवनावर मोर्चा जाणार आहेत. 

तर 26 जानेवारी रोजी हजारो शेतकरी ‘राष्ट्रगीत’ म्हणून या आंदोलनाची सांगता करणार आहेत. शेतकरी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवहान देखील शेतकरी – शेतकरी – कामगार संयुक्त कृती समितीने केली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय