Saturday, May 11, 2024
Homeआरोग्यचुकूनही हे ३ पदार्थ खाऊ नका, वाढेल कॉलेस्ट्रॉलचा त्रास, ब्लॉक होतील रक्तवाहिन्या

चुकूनही हे ३ पदार्थ खाऊ नका, वाढेल कॉलेस्ट्रॉलचा त्रास, ब्लॉक होतील रक्तवाहिन्या

शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं असतं. पेयं आणि खाद्यपदार्थांमधून आपल्या शरीराला आवश्यक असलेले पौष्टिक घटक मिळतात. त्यामुळे शरीराचं कार्य सुरळीत चालू राहतं.आहाराचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो. म्हणजेच चांगला आहार असेल तर आरोग्य चांगलं राहतं आणि आहार योग्य नसेल, तर आरोग्य बिघडतं. सध्याच्या काळात कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या अनेकांना, मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्याचं सर्वांत मोठं कारण म्हणजे अनहेल्दी आहार.

सॅच्युरेटेड फॅट, मीठ आणि साखरेचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ आहारात जास्त प्रमाणात असले, तर रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साठायला लागतं. याने गंभीर रूप धारण केलं, तर मृत्यूही उद्भवू शकतो. कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या व्यक्तींनी काही प्रकारचे खाद्यपदार्थ खाणं पूर्णतः टाळलं पाहिजे, जेणेकरून कोलेस्ट्रॉल पातळी वाढण्याला प्रतिबंध होऊ शकेल.

‘हार्वर्ड हेल्थ’च्या रिपोर्टनुसार, हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या रुग्णांनी रेड मीट अर्थात लाल मांसाचं सेवन अजिबात करून उपयोग नाही. ते खाल्लं, तर कोलेस्ट्रॉल अक्षरशः रॉकेटच्या गतीने वाढतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. लाल मांसात सॅच्युरेटेड फॅटची मात्रा खूप असते. त्यामुळे बॅड कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. रेड मीटमुळे युरिक अॅसिडचा त्रासही वाढू शकतो. म्हणूनच युरिक अॅसिडचा त्रास असलेल्यांनी, तसंच कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्यांनी लाल मांसापासून दूरच राहावं. अशा रुग्णांनी एकंदरीतच सर्व प्रकारची नॉन-व्हेज फूड्स खाणंच कमी करणं श्रेयस्कर. फ्राइड अर्थात तळलेले पदार्थ आवडत नाहीत, अशा व्यक्ती फार कमी असतात; पण तळलेले पदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वेगाने वाढते. समोसे, पकोडे, ओनियन रिंग्ज आदींसह तळलेले सर्वच पदार्थ खाणं टाळणं चांगलं. तळताना या पदार्थांची एनर्जी डेन्सिटी आणि कॅलरी काउंट वाढतो. त्यामुळे आरोग्याचं नुकसान होऊ शकतं.

प्रक्रियायुक्त पदार्थ खाण्याचं प्रमाण सध्या खूप वाढलं आहे; मात्र प्रक्रियायुक्त अर्थात प्रोसेस्ड फूड्स खाल्ल्यामुळे शरीराला त्रास होतो. कुकीज, केक, पेस्ट्री यांमध्ये बटर आणि शॉर्टिंगचं प्रमाण मोठं असतं. त्यामुळे त्यात कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते. म्हणूनच असे पदार्थ खाणंही टाळलं पाहिजे. त्याशिवाय साखर जास्त असलेली पेयं, सोडा आणि जास्त प्रमाणात मिठाई खाणंही टाळलं पाहिजे. कारण या पदार्थांचं सेवन केल्यामुळेदेखील कोलेस्ट्रॉलची पातळी वेगाने वाढते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्यांनी या पदार्थांचं प्रमाण आहारातून कमी करावं किंवा शक्य असल्यास ते पदार्थ खाणं पूर्णच टाळावं. ते आरोग्यासाठी नक्कीच हितकारक ठरेल.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय