Thursday, May 9, 2024
Homeआरोग्यसंध्याकाळ झाल्यावर घरात डास येतात? 8 टिप्स वापरा, कानाकोपऱ्यातले डास पळून जातील

संध्याकाळ झाल्यावर घरात डास येतात? 8 टिप्स वापरा, कानाकोपऱ्यातले डास पळून जातील

आपल्या घरात एखादा डास जरी दिसला तरी तो रात्रभर छळतो आणि मग झोप लागत नाही. सतत तो कानाजवळ येऊन त्रास देतो. झोपमोड तर होतेच पण घरात आपल्या नकळतही खूप ठिकाणी डासांची पैदास होत असते. आता काही बिनतोड उपाय केले तर घरातल्या कानाकोपऱ्यातले डास तुम्ही सहज घालवू शकता.बदलत्या हवामानानुसार आता डासांचं संकट घोंगावणार आहे आणि लवकरच डेंग्यूच्या तापाच्या बातम्या कानावर येतील. या परिस्थितीत साध्या घरगुती उपायांनी आपण डासांपासून दूर राहू शकतो. निसर्गोपचार किंवा घरगुती उपचारांवर जर तुमचा विश्वास असेल तर हे काही उपाय केल्यास तुमच्या घरात खरंच डास येणार नाहीत.

घरातल्या डासांना कसं पळवाल?

१. लिंबू आणि मोहरीचं तेल


एक पिकलेलं लिंबू घ्या. आता सुरीनं ते अर्धं चिरून घ्या. त्यातला चोथा काढून घ्या. मग यात एक चमचा मोहरीचं तेल घाला आणि मग त्यात लवंग, कापूर घालून एक वात लावा आणि ती पेटवून ठेवा. यामुळे सगळे डासे पळून जातील.

२. कापूर


डासांवर बिनतोड उपाय म्हणजे कापूर. यामुळे घरात छान सुगंधही येतो आणि डासही पळून जातात. कापराच्या काही वड्यांचा चुरा कोणत्याही तेलात मिसळा. डासांना घालवण्यासाठी या तेलाचा दिवा लावा. यामुळे डास घरापासून लांबच राहतील.

३. तुळस


डासांना घरातून बाहेर काढण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती तुळस. घरात डास येण्यापासूनच रोखायचं असेल तर घराच्या खिडक्या आणि दरवाजाच्या आसपास तुळशीची काही पानं पसरून ठेवा.

४. लसूण


लसणाच्या उग्र वासाचा एखादा स्प्रे डासांना मारण्यासाठी तयार करून ठेवता येईल.
५. कडूनिंब


कडूनिंबाच्या पानातला कडवटपणा सगळ्या प्रकारच्या कीटकांना आणि विषाणूंवर गुणकारी असतो. डासांना घरापासून लांब ठेवण्यासाठी तुम्ही या पानांचं तेल त्वचेवर लावू शकता किंवा दिव्यामध्येही याच्या तेलाचा वापर करून तो दिवा घरात लावू शकता.

६. लिंबू आणि लवंग


जर तुम्ही लिंबाच्या काही फोडींमध्ये लवंग लावून त्याला घरातल्या कोपऱ्यांमध्ये ठेवलंत तर यामुळे होणारा परिणाम नक्कीच बघा.

७. नीलगिरी तेल



जेव्हा नैसर्गिक पद्धतीनं घरातल्या डासांवर उपाय करायचा असेल तेव्हा नीलगिरी तेल खूप महत्त्वाचं आहे. हे तेल तुम्ही त्वचेवर लावू शकता. यामुळे डास आजिबात चावणार नाहीत.

८. पुदिन्याचं तेल



पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळून ते मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. तसंच हे त्वचेवर लावूनही घरगुती उपाय करता येईल. यामुळं डास जवळ येणार नाहीत आणि त्वचेचा ताजंतवानं वाटेल यातून पुदिन्याचा छान सुगंधही येईल.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय