Saturday, December 7, 2024
Homeकृषीकिसान सभेचे जिल्हा अधिवेशन वाशी येथे संपन्न - सुदेश इंगळे यांची माहिती

किसान सभेचे जिल्हा अधिवेशन वाशी येथे संपन्न – सुदेश इंगळे यांची माहिती

उस्मानाबाद : अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा अधिवेशन वाशी येथे उत्साहात संपन्न झाल्याची माहिती सुदेश इंगळे यांनी दिली. या अधिवेशनास किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष सिधाप्पा कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना सिधप्पा कलशेट्टी म्हणाले, महागाई प्रचंड असताना 5% GST जीवनावश्यक वस्तूवर लावला आहे, ही गोष्ट चीड आणणारी आहे. दहा लाख कोटी रुपये मोदी सरकारने त्यांच्या मित्रांचे माफ केले आणि जनतेवर जीएसटी वाढवत आहे, ही विसंगती आहे.

यावेळी सुदेश इंगळे म्हणाले, केंद्र सरकारविरोधात एक वर्षभर किसान सभेच्या वतीने आंदोलन झाले. त्यामधे 750 शेतकरी हुतात्मे झाले. नंतर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माघार घेतली. हा शेतकऱ्यांच्या एक विजय झाला. परंतु, त्या आश्वासनानुसार अजूनही अंमलबजावणी झाली नाही. बेकारी प्रचंड वाढलेली असताना अग्निपथ च्या नावाने बेरोजगारी वाढणार आहे, ही सर्व मुले शेतकऱ्यांची मुले आहेत. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट लुटी च्या विरोधात एकत्र येणे गरजेचे आहे

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय