Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपाहूचीबारी व करंजखेड गावात निर्धुर चूल व दिवाळीचा फराळ वाटप

पाहूचीबारी व करंजखेड गावात निर्धुर चूल व दिवाळीचा फराळ वाटप

वांगणसुळे (दौलत चौधरी) : पेठ तालुक्यातील पाहूचीबारी येथे १०० व करंजखेड येथे १५० अशा एकुण २५० निराधार महिलांना रोटरी कल्ब नाशिक व सेवा संकल्प समिती नाशिक रोटरी क्लब आॕफ नाशिक अध्यक्ष प्रफुल बरडिया, सेक्रेटरी ओमप्रकाश रावत यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री गुरूजी रूग्णालय संचलित, सृवा संकल्प समिती नाशिक यांच्या सहकार्याने निर्धुर चूल व दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला तसेच पाहूचीबारी व करजखेंड या दोन्ही ग्रूप ग्रामपंचायतचे नव लोकनियुक्त सरपंच रमेश चौरे, कमलेश वाघमारे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

केंद्र सरकार अणि विविध राज्य आपापल्या राज्यातील वायु प्रदूषण कमी करायचा अथक प्रयत्न करत आहे. इतर राज्य जशी वायु प्रदुषण दुर करायला थांबवायला विविध उपाय करीत आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य देखील आपल्या वतीने अनेक प्रयत्न करत आहे. याच करीता महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील 38 जिल्ह्यात पर्यावरणास अनुकुल असे मोफत निर्धुर चुल वाटप करत आहे. दिवसेंदिवस गँस सिलेंडरच्या किंमती ह्या वाढतच आहे अणि वाढत्या किंमतीत गँस विकत घेणे सर्वसामान्य गरीब व्यक्तीस परवडणारे नाही. चूल फुकताना चुलीवरचा धुर नाका तोंडात गेल्याने ग्रामीण भागातील महिलांना ज्या श्वसनविषयक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागायचा तो ह्या निर्धुर चुल वाटप योजनेमुळे कायमचा बंद होणार आहे. स्वयंपाक बनवताना चूलीवर लाकडे जाळण्यासाठी राज्यात जी भरमसाठ जंगलतोड केली जात होती अणि त्याचा पर्यावरणावर जो वाईट परिणाम होत होता तो ह्या योजनेमुळे संपुष्टात येणार आहे.

खेड्या पाड्यातील महिला ह्या योजनेमुळे सशक्त अाणि आत्मनिर्भर बनतील. त्यांच्या जीवनमानात देखील याने सुधारणा होऊ लागेल. महागाईच्या काळात गॅस सिलेंडर घेणे फार जिकरीचे झाले आहे. त्याऐवजी निर्धुर चुलीचा वापर केल्यास पैशाची बचत होते. चुलीमुळे धुर होत नसल्याने महिलांच्या आरोग्यास हानी होत नाही.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रफुल्ल बरडीया अध्यक्ष रोटरी क्लब, ओमप्रकाश रावत सेक्रेटरी, रवी महादेवकर डिस्ट्रिक्ट चेअरमन, हेमराज राजपूत कम्युनिटी सर्विस डायरेक्टर संदीप खंडेलवाल, निलेश अग्रवाल, नितीन ब्रह्मा, गौरव सामनेरकर, अमित चौगुले, राजेश्वरी बालाजीवाले, सेवा संकल्प समिती तोफिक शेख, आनंदा जाधव, दमयंती बरडीया, वैशाली रावत, नव लोकनियुक्त सरपंच रमेश चौरे, कमलेश वाघमारे, पोलीस पाटील अशोक मोरे, हनुमंत मोरे, केशव चौरे, भगवान खोटरे, रामभाऊ चौधरी, सोमनाथ मोरे, हनुमंत वाघमारे, दत्तू ब्राम्हणे, ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय