Wednesday, February 28, 2024
Homeजुन्नरजुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना मोफत साहित्य वाटप व लोणावळा सहल चे आयोजन

जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना मोफत साहित्य वाटप व लोणावळा सहल चे आयोजन

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना दिव्यांग साधने साहित्य नाव नोंदणी अनेक दिवसापासून करण्यात आली होती. या वेळी प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप जुन्नर तालुका संस्थेकडे एकूण 235 लोकांनी संस्थेत साहित्य मिळावे म्हणून नाव नोंदणी करून घेतली. नाव नोंदणी झालेल्या लोकांना शनिवार दिनांक 21जानेवारी रोजी मोफत साहित्य वाटप रूचिका क्लब, मुंबई व संपर्क संस्था, भगवान महावीर विकलांग सहायता समिती यांच्या कडून मोफत साहित्य वाटप चा कार्यक्रम भाजे मळवली येथे आयोजिितकरण्यात आला होता.

तसेच जुन्नर तालुक्यातील 200 दिव्यांग लोकांना शनिवार दिनांक 21 जानेवारी ला लोणावळा ट्रीप व तसेच मोफत साहित्य तीन चाकी सायकल 26, व्हील चेअर 28, कानाची रूग्ण तपासणी करून 67 कानाची मशीन, डोळे तपासणी करून 54 लोकांना चश्मा औषधे दिव्यांग लोकांना वाटप केले. तसेच वाॅकर कृत्रीम पाय, एलबो स्टीक, काठी, कॅलिपर बुट इत्यादी साहित्य मोफत वाटप करण्यात आले. 

तसेच 20 / 21 / 22 या तीन दिवसाच्या कार्यक्रमात पुणे जिल्हा व राज्यभरातून दिव्यांग लोकानी साहित्य घेण्यासाठी हजेरी लावली. या कार्यक्रमात आत्ता पर्यत शिबिरात 324 कान नाक घसा डोळयाची तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रीया करण्यात आली व मोफत चश्मे वाटप करण्यात आले. एच.व्ही. देसाई रूग्णालयाचे या कामी सहकार्य लाभले. 711 रूग्णांची डोळयाची तपासणीचा लाभ घेतला तर 292 दिव्यांग लोकांनी साहित्याचा लाभ घेतला.

यावेळी रूचिका क्लब, मुंबई व संपर्क संस्था, सहायता समिती चे विश्वस्त किरण आर्या, अमितकुमार बॅनर्जी, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सचिन गिरी, अनुज सिंग, भगवान महावीर विकलांग सहायता चे नारायण व्यास व दिव्यांग कक्ष अधिकारी संभाजी भांगरे, जुन्नर तालुका प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अरूण शेरकर अध्यक्ष, राहुल मुसळे उपाध्यक्ष, सुनिल जंगम, सौरभ मातेले, हरी नायकोडी, केरभाऊ नायकोडी, सचिन वाव्हळ, शाहीद पटेल, सागर पवार, फरहान मीर अली, शशिकला शिंदे, सुरेखा नवले, रमेश शिंदे सतीश डावखर, किरण पाटोळे, निलेश उकीर्डै, ऐकनाथ लोखंडे, सुर्यभान थोरात, प्रकाश धोत्रे (नासिक दिंडोरी), राहुल कोळेकर (सातारा) व प्रहार रूग्ण सेवक दिव्यांग बांधव, विशेष शिक्षक समग्र शिक्षा अभियान पं.स.जुन्नर चे श्रीमती संगिता डोंगरे, रोहिणी गडदे, सिमा मोरे, जयश्री मुंढे व शिवाजी मोहीते, योगेंद्र कुलकर्णी, सतीश माळी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रस्तावित अमितकुमार बॅनर्जी, आभार अनुज सिंग तर, सूत्रसंचालन प्रदिप वाडेकर यांनी केले.

Lic
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय