Thursday, April 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभोसरीत दिव्यांग क्रीडास्पर्धा स्पर्धा उत्साहात संपन्न

भोसरीत दिव्यांग क्रीडास्पर्धा स्पर्धा उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पुणे जिल्हा परिषद पुणे समाज कल्याण अंतर्गत दिव्यांग कल्याण विभाग आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि.16, 20 व 23 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन 23/1/2023 रोजी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर भोसरी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आयुष प्रसाद यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धा मध्ये पुणे जिल्हयातील 77 विशेष शाळांमधील 1537 दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदविला. 

उद्घाटन प्रसंगी चिंचवड बधीर मूक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योगासन सादरीकरणास व पताशीबाई लुंकड अंध शाळेतील व जागृती अंध मुलींच्या शाळेतील दृष्टीहिन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीत व इशस्तवनाचे कौतुक करुन विद्यार्थ्यांना शाबासकी दिली. अस्थिव्यंग विद्यार्थ्यांच्या एक कुबडी घेऊन धावणे व दोन कुबड्या घेवून धावणे या क्रीडा स्पर्धांचे झेंडा दाखवून उद्घाटन केले. 

या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे चे चंद्रकांत वाघमारे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद पुणे चे प्रवीण कोरगंटीवार, वैदयकिय सामाजिक कार्यकर्त्या जिल्हा परिषद पुणे चे श्रीमती रोहिणी मोरे, अंध मुलांची शाळा चे संस्थापक शांतीलाल लुंकड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती संगीता कुमठेकर व रवींद्र जोशी यांनी केले.

दि 20/1/2023 रोजी बालकल्याण संस्था पुणे येथे दृष्टीहिन, कर्णबधीर, मतीमंद, अस्थिव्यंग या चार प्रवर्गातील गोळाफेक, लांब उडी, सॉफ्ट बॉल थ्रो या स्पर्धा पार पडल्या यामध्ये 21 शाळांतील 234 खेळाडुंनी सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे आयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट पुणे येथे गोळाफेक व लांबउडी या स्पर्धा झाल्या दि. 16/1/2023 रोजी बालकल्याण संस्था पुणे येथे पोहणे व बुध्दीबळ या क्रीडा स्पर्धा पार पडल्या पोहणे या क्रीडा प्रकारात 24 शाळांतील स्पर्धेत पाच शाळांतील 120 व बुद्धीबळ स्पर्धेत पाच शाळांतील 105 दृष्टीहिन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय