धारूर (बीड) : अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांना “नीट रहा नाहीतर गोळ्या घालीन” अशी धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा व शेतमजूर युनियनच्या वतीने धारुर तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्यावे, यासाठी दिल्लीमध्ये शेतकरी दोन महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. डॉ. अजित नवले हे किसान सभेचे राज्य सरचिटणीस आहेत. त्यांना फेसबुक वरुन निट रहा नाही तर गोळ्या घालीन, अशी धमकी दिली आहे.
यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कॉ. गोविद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. कलबुलर्गी व पत्रकार गौरी लंकेश इत्यादींंना धमकी देऊन त्यांची हत्या करण्यात आली आहे, ह्या ताज्या घटना असताना डॉ. अजित नवले यांना धमकी आली आहे. त्यामुळे सबंधितांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी किसान सभेने केली आहे.
निवेदन देतेवेळी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष मोहन लांब, सीटू संघटनेचे जिल्हा सचिव डॉ. अशोक थोरात, शेतमजुर युनियनच्या मनिषा करपे, काशिराम सिरसट, मिरा शिंदे, वैशाली आरसुळ, सुमित्रा डोईफोडे, कौशाला शिंदे, रामधन डापकर, ज्ञानदेव बोराडे, जगनाथ जाधव उपस्थित होते.