Saturday, April 13, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : मनोज जरांगे पाटीलांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण म्हणाले…

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटीलांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण म्हणाले…

मुंबई : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहे. मला सलाईनमधून वीष पाजून मारण्याचा कट देवेंद्र फडणवीसांचा असल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपनंतर राजकिय वर्तूळात एकच खळबळ उडाली. या आरोपावर आता फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

महायुती सरकारच्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटीलांना जीवे मारण्याच्या कटा संदर्भात फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी “सोडून द्या म्हणतं, तुमचा तरी विश्वास आहे का ? अशा गोष्टींना उत्तर देताना तुम्हाला तरी समजल पाहिजे. तुम्ही मला असे प्रश्न विचारता मला तुमच आश्चर्य वाटतं. तसेच जरांगे खोटं बोलले त्यांनाही माहित” असं उत्तर दिले आहे.

या सोबतच मनोज जरांगे पाटीलांच्या ‘मी सागर बंगल्यावर, मला मारून दाखवा’ यावर बोलताना सागर हा सरकारी बंगला आहे, लोकांचे काही प्रश्न असतील तर ते कुणीही येऊ शकतं भेटू शकतं. असेही ते म्हणाले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपतींशी शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मी फक्त माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा कुणाची तरी डाव आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा :

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा मंडप कोसळला, चार जण जखमी

ब्रेकिंग : मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना, आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळ

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप

नशेत तर्रर्र झालेल्या पोरींना उभंही राहता येईना, पिट्याभाईने दाखवली दवाखान्याची वाट

क्राईम : डॉक्टर फोनवर होते, तो आला आणि मानेवर केले 19 वार, नाशिकचा थरकाप उडवणारा VIDEO

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

NHM Nagpur : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय