Saturday, May 11, 2024
HomeNewsजुलै- 29: देश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी वाचा एका क्लीक वर

जुलै- 29: देश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी वाचा एका क्लीक वर

देशविदेश

1) भारतात अनलॉक 3.0 चे नवे नियम जाहीर; लवकरच जिम होणार सुरू

नवी दिल्ली :- नव्या नियमावलीत योग इन्स्टिट्यूट आणि जिमला परवानगी देण्यात आली आहे. 5 ऑगस्टपासून व्यायामाच्या संस्था सुरू होऊ शकतात. असे असले तरी त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. गेल्या काही दिवसांपासून हळूहळू अनेक व्यवसायांना परवानगी दिली जात आहे.

2) अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या 45 लाखावर


वॉशिंग्टन : – जगाची कोविड-१९ची संख्या १ कोटी ६९ लाख,१८ हजार दोन झाली आहे. आतापर्यंत ६ लाख ६३ हजार ५७० लोकांचा बळी गेला आहे. नव्याने १७ हजार ६८९ रुग्णांची भर तर १ हजार ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा ४५ लाखांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे अमेरिकेत तीव्र चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, अमेरिकेत कोविड व्हॅक्सीनची चाचणी करण्यात येत आहे. तिसऱ्या टप्यात ही चाचणी आली आहे.

3) आमच्याकडे कोरोनाची लस आल्यावर इतर देशांना देखील दिली जाईल – ट्रम्प

अमेरिका :- जगभरातील अनेक देश कोरोनावरील लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत देखील त्यापैकी एक आहे. ट्रम्प म्हणाले की, आमच्याकडे कोरोनाची लस आल्यावर इतर देशांना देखील दिली जाईल. लसीबाबत जगभरात वेगाने प्रयत्न केले जात आहे. कदाचित आम्ही जगातील अनेक भागांमध्ये लसीचा पुरवठा करू जसे आम्ही व्हेंटिलेटर आणि अन्य वस्तूंबाबत केले.

4) राफेल विमाने थांबलेल्या हवाई तळाजवळील समुद्रात इराणनं क्षेपणास्त्र डागली


अल धाफ्रा :- संयुक्त अरब आमिरातीच्या (यूएई) अल धाफ्रा हवाई तळाजवळील समुद्रात इराणनं अनेक क्षेपणास्त्र डागली आहेत. गंभीर बाब म्हणजे या हवाई तळावर फ्रान्समधून आलेली भारताची पाच राफेल विमाने रात्रभर थांबली होती. याच हवाई तळाजवळील समुद्रात इराणनं क्षेपणास्त्र डागली असल्याचे वृत्त आहे. इराणनं क्षेपणास्त्र डागल्याने संपूर्ण हवाई तळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

5) गुगलने घरून काम करण्याचा पर्याय ३० जून, २०२१ पर्यंत खुला ठेवला

माउंटन व्ह्यू (अमेरिका) : – गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सांगितले की, ‘जगभरातील आमच्या कर्मचाऱ्यांना कामाचे आणि इतर बाबींचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी आम्ही त्यांना घरून काम करण्याचा पर्याय ३० जून, २०२१ पर्यंत खुला ठेवत आहोत. आपल्या बहुतेक कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी जून अखेरीपर्यंत घरूनच काम करण्याची परवानगी दिली आहे.

6) तुर्की संसदेत नवीन शक्तींसह सोशल मीडिया कायदा मंजूर

तुर्की : – तुर्कीच्या संसदेच्या संसदेने बुधवारी कायद्याची मंजुरी दिली आहे, जी वाढत्या सेंसरशिपच्या चिंता असूनही सामाजिक माध्यमांचे नियमन करण्यासाठी अधिकाऱ्यांना अधिक शक्ती देते. नवीन कायद्यात तुर्कीमध्ये वापरकर्ता डेटा संग्रहित करण्यासाठी सोशल मीडिया प्रदात्यांची आवश्यकता असते.

7) डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांना कोरोनाची लागण

अमेरिका :- डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. व्हॉईट हाऊसने याबाबत माहिती दिली आहे. व्हॉईट हाऊसने याविषयी माहिती देताना सांगितले की, ट्रम्प प्रशासनामध्ये महत्त्वपुर्ण भूमिका पार पाडणारे ओ ब्रायन आयसोलेशनमध्ये आहेत व तेथूनच काम करत आहेत.

8) हज यात्रेला सुरुवात परंतु केवळ सौदी अरेबियातील लोक जाऊ शकणार

हज यात्रा :- सर्व जगभरातील मुस्लिमासाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या हज यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी ही यात्रा केवळ सौदी अरेबियात राहणाऱ्या लोकांसाठीच असल्याचं सौदी अरेबिया सरकारने स्पष्ट केलं आहे. कोरोनामुळे अत्यंत कमी लोकांनाच यात्रेची परवानगी देण्यात आली आहे. सौदी अरेबियात राहत असलेल्या विदेशी नागरिकांना देखील यात्रेला जाता येऊ शकतं. दरवेळी अंदाजे 20 लाख लोक हज यात्रा करतात. पण यावर्षी कोरोनामुळे खूप कमी लोक यात्रेला जाऊ शकतील.

9) 34 वर्षानंतर भारताच्याच्या शैक्षणिक धोरणात बदल

नवी दिल्ली :- कला, क्रीडा, संगीत, योग, समाज सेवा या विषयांना अभ्यासक्रमातच समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर संबोधले जाणार नाही. नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांसाठी बहुभाषिक अभ्यासाची तरतूद आहे. दोन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये भाषा पटकन शिकण्याची क्षमता असते. बहुभाषिकत्वाचे फायदे असल्याने मुले या वयात तीन भाषा शिकतील. भारताच्या अभिजात भाषांवरही लक्ष केंद्रित केले जाईल.



10 ) अमेरिका : राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं

अमेरिका : – अमेरिकेत राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीसाठी पहिली डिबेट २९ सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये पार पडणार आहे. कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सनं सोमवारी याबाबत माहिती दिली. “क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँड क्लिनिक ही डिबेट होस्ट करणार आहेत,”. २९ सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्षे जो बायडेन यांच्यादरम्यान थेट डिबेट होणरा आहे. दोन्ही नेते १५ ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातील मायामीमध्ये पुन्हा एकमेंकासमोर येणार आहे. तर तिसरी डिबेट २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय