पुर्णा (परभणी) : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या वतीने देशभरात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पूर्णा येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पुर्णेतील तरुण, विद्यार्थी तसेच तालुक्यातील शेतकरी वर्गाने उत्साहपूर्वक प्रतिसाद दिला. या आंदोलनात पूर्णा तालुक्यातील खांबेगाव, पिंपळा लोखंडे, लोणखुर्द, ताडकळस, व इतर गावे तसेच पूर्णा शहरातील आंदोलकांचा सहभाग होता. शेतकऱ्यांच्या मागण्यांबरोबरच विद्यार्थी व तरुणांच्याही मागण्यांंचा समावेश आहे.
यावेळी DYFI चे जिल्हाध्यक्ष नसीर शेख, अजय खंदारे, अमन जोंधळे, तुषार मोगले, प्रबुद्ध काळे, किरण खंदारे, महेंद्र खरे, संदीप, साबणे, जय ऍंगडे, भूषण भुजबळ, हर्षल अहिरे, राज जोंधळे, गंगाधर गायगोधने, रत्नदीप काळे, राहुल धुमाळे, खांबेगाव येथील सरपंच सुरेश श्रुंग्रारपुतळे, राज खंदारे, नामदेव लोखंडे उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शामसुंदर काळे, माजी उपनगराध्यक्ष जलील यांचा सक्रिय पाठिंबा होता.