जुन्नर (पुणे) : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (दि.६) शिवाजी पुतळा येथे अखिल भारतीय किसान सभा, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) तर्फे निदर्शने करण्यात आली.
यावेळी शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, किसान एकता जिंदाबाद, शेतकरी – विद्यार्थी – युवक एकता जिंदाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकारचा धिक्कार असो, या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचाही निषेध करण्यात आला. तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांवर करत असलेल्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला.
यावेळी किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, तालुका सचिव लक्ष्मण जोशी, कोंडीभाऊ बांबळे, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य सचिवमंडळ सदस्य विलास साबळे, जिल्हा सचिव रवी साबळे, निविता इदे, अक्षय निर्मळ, अक्षय रघतवान, गणेश काटळे, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनचे संजय साबळे, दिपक लाडके, रोहिदास बोऱ्हाडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.