नंदुरबार : देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने आज (दि. 3) नंदुरबार तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांवरील दडपशाही रद्द करा आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.
केंद्र सरकार शेतकऱ्यांवर दडपशाही करत आहे. सरकारने शेतकरी कायदे त्वरित मागे घ्यावे, अन्यथा तीव्र होणाऱ्या आंदोलनाला सरकार जबाबदार असेल, असे माकपचे कॉ. नथू साळवे म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.