Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणअनुसूचित जमातीच्या शाळेच्या दाखल्यावर शासन निर्णयाप्रमाणे जातीचा उल्लेख करण्याची मागणी

अनुसूचित जमातीच्या शाळेच्या दाखल्यावर शासन निर्णयाप्रमाणे जातीचा उल्लेख करण्याची मागणी

अहमदनगर : शासन परिपत्रका प्रमाणे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर यांना आॅ ल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन शाखा अहमदनगर यांच्या वतीने वतीने करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भिल्ल, ठाकर, कोकणा, कोकणी, वारली,कातकरी, कोळी महादेव या अनुसूचित जमातीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीच्या उल्लेखासोबत हिंदू असा केला जातो. यामुळे जातपडताळणी अथवा इतर कामात अडचणी येतात अथवा अवैध ठरवले जाते. यामुळे शासन परिपत्रका प्रमाणे अंमलबजावणी करुन शाळेच्या जनरल रजिस्टर १ मध्ये व शाळा सोडल्याच्या दाखल्यावर नोंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदन देतेवेळी आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ सावळे, कार्याध्यक्ष शिवानंद भांगरे, सभासद हिरामण पोपेरे, सिताराम पडवळे, सोमनाथ शिंगाडे, सिताराम चौधरी व आदिवासी युवा संघटना अहमदनगरचे अध्यक्ष महेश शेळके व अन्य उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय