Saturday, November 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपाण्याचे टाकीवर चढून मराठा आरक्षणाची मागणी

पाण्याचे टाकीवर चढून मराठा आरक्षणाची मागणी

आळंदीतील साखळी उपोषणास परिसरातून वाढता प्रतिसाद

सोळू ग्रामस्थांची आळंदीत पायी रॅली

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील आळंदी पंचक्रोशी सर्कल मढी सकल मराठा समाजायचे वतीने संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरा सामोर गळ्या चार दिवसा पासून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोळू ग्रामस्थांचे वतीने माजी सभापती रामदास ठाकूर यांचे नेतृत्वात आळंदीत जोरदार घोषणा देत पायी रॅली काढून जाहीर पाठिंबा देण्यात आला. युवक श्रीकांत काकडे यांनी आळंदी नगरपरिषदेच्या नवीन पाण्याचे टाकी वर जाऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.

आळंदी सर्कल तर्फे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी गेल्या चारदिवसा पासून ( दि. 26 ) बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे. मराठा समाजाला कायम स्वरूपी आणि टाकणारे आरक्षण मिळावे यासाठी रविवारी ( दि. 29 ) चौथ्या दिवशी सोळू ग्रामस्थांच्या वतीने माजी सभापती रामदास ठाकूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आळंदी येथील लक्ष्मी माता चौक, पोलीस स्टेशन, नगरपरिषद चौक मार्गे माऊली मंदिर महाद्वार प्रांगण उपोषण स्थळी जोरदार घोषणा देत पायी रॅली काढण्यात आली. यास मोठा प्रतिसाद मिळाला. 

साखळी उपोषण स्थळी चंदन नाना मु-हे, बाबासाहेब ठाकूर व रामदास ठाकूर यांनी मराठा आरक्षण मिळण्याचे मागणी बाबतची भूमिका मांडत मार्गदर्शन केले. यावेळी समन्वयक अर्जुन मेदनकर, सोळू ग्रामस्थ चेतन काळीद ,पंडित गोडसे, बाबासाहेब ठाकूर, विलासराज चौधरी, युवराज ठाकूर, सरपंच गोडसे, भाऊसाहेब ठाकूर, विशाल ठाकूर, विनोद ठाकूर, गणेश ठाकूर, नवनाथ ठाकूर, शुभम ठाकूर, विपुल ठाकूर, श्रद्धेश ठाकूर, नामदेव ठाकूर, शशिकांतराजे जाधव, आशिष गोगावले, व सकल मराठा बांधव मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तसेच आज मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी पाठींबा देण्यात आला. याबाबत माहिती मारुती सोळंके यांनी दिली. दि.27 रोजी आळंदी जनहित फाऊंडेशनच्या वतीने मराठा आरक्षणासाठी पाठींबा देण्यात आला. आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर,  रामदास दाभाडे, चेतन घुंडरे, ज्ञानेश्वर घुंडरे उपस्थित होते. उपोषणास संदीप पगडे, दादासाहेब करांडे, दत्ता पगडे, महेश आबुंरे, स्वप्नील जगताप, अरुण कुरे, शशिकांत राजे, शिवाजी सोमुसे यांचेसह परिसरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड तालुका उपाध्यक्ष सुनील बाबासाहेब गावडे, चारुदत्त प्रसादे, संदीप पगडे यांनी आपआपल्या पदाचे राजीनामे दिले. सोळू, केळगाव. हनुमानवाडी, धानोरे येथील ग्रामस्थांनी उपोषण स्थळी येत जाहीर पाठिंबा दिला. 

युवा कार्यकर्ते श्रीकांत काकडे यांनी टाकीवर जाऊन मराठा आरक्षणाचे मागणी साठीस केलेल्या आंदोलना दरम्यान आळंदी पोलीस सेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी प्रशासकीय यंत्रणा सतर्क केली. निसार सय्यद, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील यांचेसह आळंदी ग्रामस्थ सकल मराठा समाज आळंदी सर्कल यांनी परिश्रम पूर्वक श्रीकांत काकडे यांना सुखरूप उतरवीत सुसंवाद साधला. उपोषण स्थळी ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु रहावे यासाठी शपथ घेतली. श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, रामचंद्र महाराज सारंग यांनी संस्थेचे वतीने हरिपाठ सेवा रुजू केली.

संबंधित लेख

लोकप्रिय