Saturday, December 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPimpri Vidhan Sabha 2024 : सुलक्षणा शीलवंत दूरदृष्टीचे व्हिजन असलेल्या उमेदवार -...

Pimpri Vidhan Sabha 2024 : सुलक्षणा शीलवंत दूरदृष्टीचे व्हिजन असलेल्या उमेदवार – चेतन बेंद्रे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – आकुर्डी : पिंपरी विधानसभेला महाविकास आघाडी कडून प्रथमच उच्चशिक्षित महिला उमेदवार मिळाल्या असून, सुलक्षाणा
शिलवंत या दूर दृष्टीचे व्हिजन असलेल्या उमेदवार आहेत असे प्रतिपादन आम आदमी पार्टी चे नेते चेतन गौतम बेंद्रे यांनी केले. (Pimpri Vidhan Sabha 2024)

आकुर्डी येथे आयोजित कॉर्नर सभेत बोलताना बेंद्रे म्हणाले, आम आदमी पार्टी ने महाविकास आघाडी ला पाठींबा जाहिर केला असल्यामुळे आम्ही आघाडी च्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी सहकार्य करणार आहोत.

सुलक्षणा शिलवंत यांच्या रुपाने पिंपरी विधान सभेला प्रथमच महिला उमेदवार मिळाल्याने सर्व पक्षाची शक्ती त्यांच्या मागे असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे.

यावेळी राजरत्न शिलवंत, ज्ञानेश्वर ननावरे, आम आदमी पक्षाचे ब्रम्हानंद जाधव, राज चाकणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. (Pimpri Vidhan Sabha 2024)

कार्यक्रमाचे संयोजन आण्णा भोसले, मोहसीन गडकरी व अमर करांडे यांनी केले .
तर सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी व सतीश सिलम यांनी आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय