Friday, November 22, 2024
Homeआंबेगावअभिषेक गवारी या विद्यार्थ्याच्या आकस्मिक मृत्युला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

अभिषेक गवारी या विद्यार्थ्याच्या आकस्मिक मृत्युला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

घोडेगाव : अभिषेक गवारी या विद्यार्थ्याच्या आकस्मिक मृत्युला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आंबेगाव तालुका समितीच्या वतीने प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (Demand action against those responsible for sudden death of student Abhishek Gawari)

निवेदनात म्हटले आहे की, शासकीय आश्रमशाळा गोहे बु. ता.आंबेगाव जि.पुणे येथील इयत्ता बारावीचा, विद्यार्थी अभिषेक बबन गवारी हा विद्यार्थी आश्रमशाळेत निवासी असताना आजारी असूनही शाळेचे मुख्याध्यापक व वसतिगृह अधीक्षक यांनी त्याला वेळेत उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले नाही. त्यामुळे पालकांनी त्या विद्यार्थ्याला स्वतः उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. आश्रमशाळेतील यंत्रणेकडून वेळेत उपचार सुरू न झाल्याने पुढे त्या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक बनली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

death of student Abhishek Gawari

याबाबत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी पोलीस प्रशासन व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्याकडे तक्रार केली आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूला सहा दिवस उलटूनही अजून कुठल्याच प्रकारची चौकशी संबंधित यंत्रणेकडून सूरू झालेली नाही. कुठे साधी बातमीही प्रसारीत झालेली नाही. हे प्रकरण जाणीवपूर्वक दाबले जात आहे, असा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

एसएफआय संघटनेने प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

१) अभिषेकच्या मृत्यूच्या सदर प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

२) प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, अनुदानित व नामांकित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे यांची प्रत्येक महिन्याला आरोग्य तपासणी करण्यात यावी. यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्याचे आरोग्य कार्ड तयार करून त्यांचा विमा काढण्यात यावा. 

३) आश्रमशाळा, वसतिगृहे यांचे पायाभूत सुविधांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावेत. 

यावेळी अभिषेक चे वडील बबन गवारी, चुलते संतोष गवारी, धोंडू गवारी, शंकर केंगले, उपसरपंच सीताराम गवारी यासोबतच किसान सभेचे राजू घोडे, एसएफआय पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, आंबेगाव तालुका सचिव समीर गारे, उपाध्यक्ष रोशन पेकारी, सहसचिव योगेश हिले, कोषाध्यक्ष रोहिदास फलके तसेच माजी उपसभापती सुभाष तळपे, बिरसा ब्रिगेड चे प्रवीण पारधी, आंनद मोहरे, ज्ञानेश्वर शेखरे, उमाताई मते आदी उपस्थित होते. 

बँक नोट मुद्रणालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज !

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; ऑनलाईन करा अर्ज! 

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

death of student Abhishek Gawari
death of student Abhishek Gawari
संबंधित लेख

लोकप्रिय