Friday, December 27, 2024
Homeसमाजकारणकोरोनाबाबत गैरसमज पसरवणे धोक्याचे : सुशिलकुमार पावरा

कोरोनाबाबत गैरसमज पसरवणे धोक्याचे : सुशिलकुमार पावरा

रत्नागिरी : कोरोनामुळे अनेकांचे कुटुंबच्या कुटुंब व संसार उद्ध्वस्त झाले. कोणाचे आई तर कुणाचे वडील, कोणाचा मुलगा तर कोणाची मुलगी,कोणाचा भाऊ तर कुणाची बहिण, कोणाची बायको तर कोणाचा कमावता आधार गेला.त्यामुळे अनेक जणांचे जीवन उद्धवस्त झाले.काही लोक नशिबाला दोष देत आहेत तर काही जण हा निसर्गाचा प्रकोप आहे असे बोलत आपल्या संसाराची गाडी हाकवत आहेत. काही जण कोरोनाच्या भीतीत जीवन जगत आहेत. काही जण कोरोनाच्या गैरफायदा घेत आपले खिसे भरत आहेत, लोकांना लुटत आहेत. अनेक लोकांना कोरोनाने तारलं तर काहींना मारलं, असे लोक म्हणताय.तरी यात कुटुंब उध्वस्त होणा-यांची संख्या जास्त आहे. ज्याचे जळते त्यालाच कळते. याप्रमाणे ज्याला कोरोना झाला आहे व ज्याचे कुणी कोरोनाने दगावले आहे.त्यांनाच कोरोना हा रोग आहे, कोरोना ही महामारी आहे हे समजले आहे.

सोशल मिडीयावर काही अतिशहाणे लोक कोरोनाबाबत समाजात गैरसमज पसरवत आहेत. कोरोना हा रोग नाही, कोरोना हे एक षडयंत्र आहे वगैरे. काही अतिशहाणपणा दाखवता दिसत आहेत. विनाकारण वाघासारखे बाहेर फिरताना दिसत आहेत. आपणच गुराढोरांसारखं वागलं तर आपण माणसंच नाही म्हणावं लागेल. कारण कोरोना महामारीत अनेक डाॅक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी,शिक्षक इत्यादी लोकांनी जीव गमावला आहे. हातावर पोट भलणा-या लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासन अनेक उपाययोजना करत आहेत. त्याचा फायदा कमी  व नुकसान अधिक होताना दिसत आहे. गरीब लोकांचे होत आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता, त्यामुळे लोकांनी सुटकेचा श्वास धरला होता. काही लोक कोरोनाबाबत बेफीकीर राहीली. मात्र दुस-या वाटेत लाटेत मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला असून जास्त प्रमाणात रूग्ण सापडत आहेत. त्या रुग्णांच्या उपचारासाठी डाॅक्टर व नर्स, आरोग्य कर्मचारी कमी पडत आहेत. काही सुविधा अपू-या पडत आहेत. शासनाकडून जाहीरातीद्वारे ती भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक अडचणी येत आहेत. कोरोनाबाबत गैरसमज पसरविणा-या लोकांचाही सामना करावा लागत आहे.  

या महामारीत अनेक नवीन रूग्ण सापडत आहेत तर अनेक लोक मरत आहेत. पोलीस व डाॅक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी 12-12 तास तर वेळ पडल्यास 24 तास काम पाडत रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. सरकारी यंत्रणेला साथ देण्याऐवजी काही लोक विनाकारण फिरत आहेत. अनेक समज गैरसमज पसरवत आहेत. 

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हादरले आहे.म्हणून कोरोनाबाबत गैरसमज पसरवू नका. चुकीचे संदेश देणारे विडीओस व पोस्ट वाॅटसपवर तसेच सोशल मिडीयावर पसरवू नका. सरकारी यंत्रणेला व प्रशासनाला या संकटकाळी साथ द्या. समाजप्रबोधन करा, लोकांना कोरोना बाबत योग्य माहिती द्या. जनजागृती करा. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुशीलकुमार पावरा यांनी जनतेला केले आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय